शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदर इमारतीचे पायलिंग सुरू असताना क्रेनचा पट्टा तुटून ६ टन वजनाचा पयलींग पाईप पडून अपघात

By धीरज परब | Updated: March 12, 2024 18:38 IST

भाईंदर पश्चिमेस उत्तनकडे जाणाऱ्या मार्गवर भोला नगर जवळ जे पी इन्फ्रा बड्या विकासकाचा इमारत बांधकाम प्रकल्प सुरु आहे.

मीरारोड - भाईंदर पश्चिमेस एका बड्या विकासकाचे इमारत बांधणीच्या कामादरम्यान पायलिंग सुरु असताना क्रेनचा पट्टा तुटून पयलींगचा भला मोठा अवजड पाईप लगतच्या रहिवासी भाग परिसरात पडला . ह्यात जीवित हानी झाली नसली तरी नुकसान झाले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे . 

भाईंदर पश्चिमेस उत्तनकडे जाणाऱ्या मार्गवर भोला नगर जवळ जे पी इन्फ्रा बड्या विकासकाचा इमारत बांधकाम प्रकल्प सुरु आहे. मंगळवारी त्याठिकाणी पयलींग चे कामसुरू होते . त्यावेळी क्रेन च्या सहाय्याने पयलींग साठीचा भला मोठा पाईप उचलत असताना क्रेनचा पट्टा तुटला .  सुमारे ६० फूट लांब व ६ टन वजनाचा तो पाईप लगत असलेल्या भोला नगर झोपडपट्टी येथे  पडला .  दोघा फेरीवाल्यांच्या हातगाड्यांचे नुकसान झाले . तसेच या घटनेने परिसरात घरांना तडे गेल्याचे रहिवाश्यानी सांगितले. एरव्ही भागात मुलं खेळत असतात व रहिवाश्यांचा वावर असतो . सुदैवाने अपघात घडला त्यावेळी कोणी नसल्याने जीवित हानी टळली. 

अपघाताचे वृत्त कळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत पाईप बाजूला करण्याचे काम केले . विकासका कडून सुरक्षा उपायांचे पालन केले जात नसल्याने सदर अपघात घडला आहे . विकासक दिवस - रात्र येथे पायलिंगचे काम करत असल्याने रात्रीची झोप सुद्धा मिळत नाही व त्रास होत असल्याचा आरोप रहिवाश्यानी यावेळी केला . या प्रकरणी नुकसान झाले त्याची भरपाई मिळावी , रात्रीचे काम बंद करावे व निष्काळजीपणा बद्दल गुन्हा दाखल करावा अशी मागणी रहिवाश्यांनी केली आहे . 

टॅग्स :mira roadमीरा रोड