शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भर पावसातही खाद्यपदार्थांच्या हातगाड्या रस्त्यांवरच, कारवाईला मुहूर्त मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 19:43 IST

रस्त्यांवर उभ्या असणा-या खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांवर तातडीने कारवाईचे आदेश गेल्या आठवड्यात दिले होते.

डोंबिवली: पावसाळयाच्या दिवसांमध्ये साथरोगांना आळा घालण्यासाठी महापालिका आयुक्त गोविंद बोडकेंनी सार्वजनिक ठिकाणी रस्त्यांवर उभ्या असणा-या खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांवर तातडीने कारवाईचे आदेश गेल्या आठवड्यात दिले होते. परंतु तरीही शहरात ठिकाठिकाणी हातगाड्या उभ्या असल्याचे दिसून येत आहे.इंदिरागांधी चौक, चार रस्ता, डिएनसी शाळेजवळ, पेंढरकर महाविद्यालयालगत, शेलारनाका, गोग्रासवाडी, दत्तनगरचौक, फडके रस्ता परिसर, नेहरु रस्ता आदी भागात हातगाड्यांवरील विक्री सर्रास सुरु आहे. पावसाचा जोर कमी अधिक होत असल्याने माशांचा प्रार्दुभाव वाढला आहे. त्या माशा ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यांवर, चिखलात सर्वत्र घाणीत तसेच खाद्यपदार्थांवर बसत असल्याने रोगराईची शक्यता आहे. त्यासाठी सर्व ठिकाणी वेळीच कारवाई होणे गरजेचे आहे.यासंदर्भात ग प्रभाग क्षेत्र अधिकारी सुर्यकांत जगताप यांनी सांगितले की, आयुक्तांचे आदेश मिळाले असून त्यावर सोमवारपासून कार्यवाही सुरु झाली आहे, लवकरच फरक दिसून येईल. नागरिकांनीही उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नयेत, जेणेकरून असे खाद्यपदार्थ विक्री करणा-या व्यावसायिकांना प्रोत्साहन मिळणार नाही, असे आवाहन त्यांनी केले आहे.