शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

कोरोना काळात वसई महापालिकेला करदिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 00:07 IST

मालमत्ता कराची वसुली : तिजोरीत दररोज ५० लाखांची पडतेय भर

लोकमत न्यूज नेटवर्कविरार : २०१९-२०२० या आर्थिक वर्षाच्या काळात सुमारे ३०० कोटींच्या कर वसुलीचे उद्दिष्ट समोर ठेवलेल्या वसई-विरार शहर महानगरपालिकेला कोरोना काळामुळे चांगलाच फटका बसला. ३०० कोटी कर वसुलीचे उद्दिष्ट केवळ कोरोनासारख्या जागतिक आपत्तीमुळे पूर्ण झाले नाही. मात्र तरीही महापालिकेला महसूल प्राप्तीच्या बाबतीत काहीसा दिलासा मिळाला आहे. मालमत्ता करातून महापालिकेच्या तिजोरीत दैनंदिन ५० लाखांची भर पडत आहे. दरम्यान, महापालिकेकडून ६० टक्के बिलांचे वाटप करण्यात आले असून ४० टक्के बिलांचे वाटप लवकरच होणार असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली.

वसई-विरार महापालिका परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. कोरोनाकाळात शाळा-महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांना आॅनलाईन शिक्षण देण्यात येत आहे. असे असताना वसई-विरार शहर महानगरपालिकेकडून नागरिकांना देण्यात आलेल्या घरपट्टीवर शिक्षण कराचा समावेश करण्यात आला होता. तर यंदा कोणत्याही प्रकारची वृक्ष लागवड महापालिकेकडून केली गेली नसताना याच घरपट्टीत वृक्ष कराचाही समावेश करण्यात आला होता. याबाबत नागरिकांनी शिक्षण कर आणि वृक्ष करासंदर्भात महापालिकेला वस्तुस्थिती समोर ठेवून जाब विचारत हे दोन्ही कर रद्द करून सुधारित घरपट्ट्या देण्याचे आवाहन केले होते. मात्र पालिकेकडून कराच्या वसुलीसंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

शिक्षण करातून वृक्षांची निगा आणि संवर्धनमहापालिकेकडून घरपट्टीवर नमूद केलेला शिक्षण कर हा राज्य शासनाला सुपूर्द करण्याबरोबरच महापालिकेतील वृक्षांची निगा आणि संवर्धन करण्यासाठी वसूल करण्यात येत असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. राज्य शासनाने शिक्षण कर न घेण्याचे आदेश दिल्यास महानगरपालिका शिक्षण कर घेणार नाही, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, यंदा वसई-विरार शहर महानगरपालिकेला कोरोना काळात मालमत्ता कराच्या वसुलीने चांगले उत्पन्न मिळू लागले आहे. दररोज ५० लाखांचा कर पालिकेच्या तिजोरीत जात असल्याने एक प्रकारे महापालिकेला करदिलासा मिळाला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार