शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गाडी खाडीपुलाचे काम रखडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 00:46 IST

पुराचा फटका : संगणक, कागदपत्रे, साधनसामग्री पाण्यात भिजल्याने कंत्राटदाराचे झाले मोठे नुकसान

कल्याण : वाहतूककोंडीची समस्या सोडवण्यासाठी कल्याण-भिवंडी मार्गावरील दुर्गाडी खाडीपुलावर सहापदरी पुलाचे बांधकाम सुरू आहे. मात्र, गेल्या आठवड्यात आलेल्या पुराचा फटका या बांधकामाला बसला असून कंत्राटदार कंपनीचे अतोनात नुकसान झाले आहे. पुलाच्या कामासाठी आणलेली साधनसामग्री पुराच्या पाण्यात गेली. त्यामुळे या पुलाच्या कामात व्यत्यय येऊ न, हे काम रखडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दुर्गाडी खाडीवर अस्तित्वात असलेला हा पूल अरुंद असल्याने त्यावरून वाहनांची रहदारी अत्यंत संथगतीने सुरू असते. परिमाणी, वाहतूककोंडीचा सामना वाहनचालक आणि प्रवाशांना सहन करावा लागतो. या पुलाच्या निर्मितीसाठी एमएमआरडीएमार्फत निविदा काढून ते सुप्रीम कंपनीला देण्यात आले होते. जवळपास ७३ कोटी रुपये खर्चाचे हे काम असून या कंत्राट कंपनीला कामाचा कार्यादेश दिला गेला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जुलै २०१६ मध्ये कामाचा शुभारंभ केला गेला. १८ महिन्यांत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. कंत्राटदाराकडून होत असलेला विलंब आणि वाहतूककोंडीचा प्रश्न पाहता याप्रकरणी शिवसेनेचे माजी नगरसेवक रवी पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला. तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि महापौर विनीता राणे यांनी याप्रकरणी एमएमआरडीए आयुक्तांकडे बैठक घेऊन हा विषय तातडीने सोडवण्याची आग्रही मागणी केली होती. त्यामुळे एमएमआरडीएने सुप्रीम कंपनीकडून पुलाचे काम काढून घेतले.आॅक्टोबर २०१८ मध्ये हे कंत्राट रद्द करून एमएमआरडीएने नवा कंत्राटदार नेमण्याची प्रक्रिया सुरू केली. नव्याने टीएनटी कंपनीला पुलाचे काम दिले. कंपनीला मार्च २०१९ मध्ये नव्याने कार्यादेश दिला गेला. टीएनटी कंपनीने रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीवरील पुलाचे काम केले होते. हा पूल १६५ दिवसांत कंपनीने बांधला होता. दुर्गाडी खाडीपुलाचे काम जलद होण्यासाठीच या कंपनीला प्राधान्य दिले गेले. मार्चपासून अवघ्या साडेतीन महिन्यांत कंपनीने वेगाने काम केले. मात्र, या संपूर्ण कामावर पुराचे पाणी फिरले आहे.पुराच्या पाण्याचा फटका कंत्राटदार कंपनीला बसला असून साधनसामग्री वाहून गेली आहे. कामाच्या ठिकाणी असलेल्या कंटेनर केबिनमध्ये पाणी घुसले. त्यात असलेल्या संगणकांत बिघाड झाला आहे. कामाची महत्त्वाची कागदपत्रे पाण्यात भिजून ती नष्ट झालेली आहेत. अशा परिस्थितीत पुन्हा काम कसे उभे करायचे, असा प्रश्न कंत्राटदार कंपनीपुढे उभा ठाकला आहे.कंत्राटदार कंपनीला झालेले नुकसान कंत्राटदाराने सोसायचे की, त्याची भरपाई सरकार देणार, असा प्रश्न आहे. कंत्राटदार कंपनीतर्फे कंपनीचे झालेल्या नुकसानभरपाईचा पंचनामा करण्यासाठी कल्याण तहसीलदारांकडे कंपनीच्या प्रतिनिधींनी पत्र दिले होते. मात्र, त्यांच्या भरपाईच्या पंचनाम्याविषयी तहसील कार्यालयाकडून प्रतिसाद मिळालेला नाही.पूल लवकर झाला तर वाहतूककोंडी सुटण्यास मदत होईल. कल्याणच्या सगळ्या एण्ट्री पॉइंटवर पुलांची कामे सुरू आहेत. तसेच एण्ट्री पॉइंटवरील पुलांवर वाहतूककोंडीची समस्या आहे. याकडे सरकारी यंत्रणांनी गांभीर्याने पाहण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.कंत्राटदार भरपाईच्या प्रतीक्षेतकंत्राटदार कंपनीला झालेले नुकसान कंत्राटदाराने सोसायचे की त्याची भरपाई सरकार देणार, असा प्रश्न आहे. कंत्राटदार कंपनीतर्फे कंपनीच्या झालेल्या नुकसानभरपाईचा पंचनामा करण्यासाठी कल्याण तहसीलदारांकडे कंपनीच्या प्रतिनिधींनी पत्र दिले होते. मात्र, त्यांच्या नुकसानभरपाईच्या पंचनाम्याविषयी तहसील कार्यालयाकडून प्रतिसाद मिळालेला नाही. तहसीलदार व पोलीस एकमेकांवर ही बाब ढकलत असल्याचे कंपनीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. पुलाचे काम १८ महिन्यांत पूर्ण करायचे होते. कंपनी चांगली मिळूनही पावसाच्या फटक्यामुळे पुलाचे काम रखडणार आहे. आधीच्या नाकर्त्या कंत्राटदारामुळे झालेला विलंब आणि आताचे नैसर्गिक कारण यामुळे पुलाचे काम लवकर होईल, असे दिसून येत नाही.

टॅग्स :kalyanकल्याणthaneठाणे