शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

डम्पिंगची आग धुमसतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 00:24 IST

धुराचे साम्राज्य : ३० ते ४० हजार नागरिकांच्या आरोग्याला धोका

उल्हासनगर : डम्पिंगवरील आग विझत नसल्याने धुराने ३० ते ४० हजार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. डम्पिंग ग्राउंड हटवण्यासाठी वज्र संघटना व अन्यायविरोधी संघर्ष समितीच्या वतीने १९ आॅक्टोबरला पालिकेसमोर उपोषण करणार आहेत.उल्हासनगरमध्ये डम्पिंगचा प्रश्न ऐरणीवर आला असून डम्पिंगला लागत असलेल्या आगीमुळे परिसरात धुराचे साम्राज्य निर्माण झाले. पालिका डम्पिंगवरील आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यांना काही प्रमाणात यश येत असले, तरी पुन्हा आग लागत असल्याने संशय व्यक्त केला जात आहे. कचऱ्याचे विघटन करण्यासाठी २२ लाखांच्या निधीतून बायोतंत्रज्ञान वापरण्यात येत आहे. डम्पिंगवरील कचरा सपाटीकरणावर तब्बल साडेतीन कोटींच्या खर्चाला मागील आठवड्यात स्थायी समितीने मंजुरी दिली. स्थायी समितीच्या निर्णयावर सर्व स्तरांतून टीका होत असून विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे यांनी सपाटीकरणाच्या प्रस्तावाची चौकशी करण्याची मागणी केली. सपाटीकरणासाठी वापरण्यात येणाºया पोकलेन व जेसीबी मशीनची किंमत साडेतीन कोटी नसल्याची टीका होत आहे.डम्पिंगवरील आगीच्या धुरामुळे गायकवाडपाडा, महात्मा फुलेनगर, खडीखदाण, टँकर पॉइंट, दुर्गापाडा आदी परिसरांतील ३० ते ४० हजार नागरिकांना धुरांचा त्रास सुरू झाला. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा ठाकल्याने डम्पिंग हटवण्याची मागणी परिसरातून होत आहे.स्थानिक नगरसेवक संतरामदास जेसवानी, कविता गायकवाड, विकास पाटील आदींनी डम्पिंग हटविण्याबाबत ठिय्या आंदोलनासह उपोषण केले. नगरसेवक किशोर वनवारी, समाजसेवक पी.एस.अहुजा , प्रमोद टाले, विजय पाटील आदींनी पालिका आयुक्त कार्यालयासमोर धरणे धरून आणि महासभेत ठिय्या आंदोलन करून डम्पिंग हटविण्याची मागणी केली. सामाजिक संघटना वज्र यांनीही डम्पिंगबाबत पालिकेसह सरकारकडे पाठपुरावा केला आहे. उसाटणे येथील डम्पिंग मिळण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी होत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरdumpingकचरा