शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

बेशिस्त वाहनचालकांमुळे कोंडी

By admin | Updated: January 14, 2017 06:29 IST

एकीकडे फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला असताना वाहनचालकांचा बेशिस्तपणाही वाहतुककोंडीला

डोंबिवली : एकीकडे फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला असताना वाहनचालकांचा बेशिस्तपणाही वाहतुककोंडीला कारणीभूत ठरत आहे. त्याचाच एक प्रत्यय शुक्रवारी पूर्वेकडील फडके मार्गावर आला. केडीएमटी आणि रिक्षाचालकाच्या बेशिस्तपणामुळे अन्य वाहनचालकांना कोंडीचा त्रास नाहकपणे सोसावा लागल्याची घटना दुपारी सव्वाबाराच्या सुमारास घडली. या घटनेत केडीएमटी चालकाच्या अरेरावीचा नमुनाही पहावयास मिळाला.पूर्वेला रेल्वे स्थानकाजवळील बाजीप्रभू चौक ते अप्पा दातार चौक हा रस्ता फडके रोड म्हणून ओळखला जातो. या मार्गावरील मदन ठाकरे चौकापासून बाजीप्रभू चौकादरम्यान एक दिशा मार्ग आहे. त्यामुळे बाजीप्रभू चौकातून मदन ठाकरे चौकाकडे जाण्यास वाहनांना बंदी आहे. दरम्यान याठिकाणी झालेल्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामांमुळे काढलेले सूचनांचे फलक पुन्हा लावण्यात आलेले नाही. त्यामुळे या मार्गावर वाहनचालकांची बेशिस्त वाढत चालली आहे. मदन ठाकरे चौकाकडे वाहनांना नो एंट्री असतानाही शुक्रवारी एका रिक्षाचालकाने त्या दिशेने वाहन नेले. तेवढ्यात समोरून आलेल्या केडीएमटीच्या निवासी विभागाच्या बसने त्याला जाण्यास जागा न देत त्याची कोंडी होईल, अशा प्रकारे बस थांबवली. यामुळे दोन्ही वाहने एकाच जागी थांबल्याने अन्य चालकांनाही याचा फटका बसला. अन्य वाहनचालकांनी केडीएमटीच्या चालकाला बस हळूहळू पुढे नेण्यास सांगितले. परंतु, बस बाजूला घेण्याऐवजी त्याने अन्य चालकांशी हुज्जत घातली. यावेळी काही पादचाऱ्यांनीही त्याला बस पुढे घेण्याची विनंती केली. मात्र त्याने हेकेखोरपणा सुरूच ठेवला होता. काही वेळाने बस मार्गस्थ झाली. परंतु, या कोंडीचा नाहक मनस्ताप वाहनचालक व नागरिकांना सहन करावा लागला. दरम्यान, दुपारी १२ च्या सुमारास पश्चिमेलाही कोंडी झाली. स्टेशनजवळील डीएनएस बँकेसमोर काँक्रिटीकरणाचे काम सुरू झाल्याने सुभाष रोडहून आलेली वाहने अडकली. गुप्ते रोडहून एव्हरेस्ट सोसायटीकडून जाणारी वाहनेही अडकली. (प्रतिनिधी)