शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कडेकोट बंदोबस्तात कार्यकर्त्यांची कोंडी

By admin | Updated: February 24, 2017 07:31 IST

वर्तकनगर येथील महिला बचत गट इमारतीमध्ये मतमोजणी असल्याने या भागात

ठाणे : वर्तकनगर येथील महिला बचत गट इमारतीमध्ये मतमोजणी असल्याने या भागात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. त्यामुळे अतिउत्साही कार्यकर्त्यांना पोलिसांनी मतमोजणी केंद्रापासून लांब ठेवले होते. मात्र, मतमोजणी केंद्रामध्ये उमेदवारांच्या प्रतिनिधींना केलेली मोबाइलबंदी आणि कूर्मगतीने बाहेर येणारे निकाल यामुळे कार्यकर्त्यांची चांगलीच कोंडी झाली.सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू होणार असल्यामुळे दोन तास आधीच वर्तकनगर ते लोकमान्यनगर पाडा क्रमांक-२ कडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला होता. या इमारतीकडे येण्यासाठी एका बाजूला अर्धा ते एक किलोमीटर अंतरावर वाहने लावावी लागत होती. दुसऱ्या बाजूलाही अर्धा किलोमीटर दूरपासून रस्ता बंद करण्यात आला होता. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. त्यातून मतमोजणीसाठी अत्याधुनिक यंत्रणा असूनही कूर्मगतीने काम सुरू होते. एका प्रभागाचा निकाल दोनदोन तास लागत नव्हता. त्यामुळे दोनदोन प्रभागांचे कार्यकर्ते एकाच वेळी मोठ्या प्रमाणात या परिसरात जमा झाले होते. सुरुवातीला प्रभाग ६ मधील राष्ट्रवादीचे चारही उमेदवार निवडून आल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. त्यानंतर, प्रभाग १३ मधून शिवसेनेच्या चारही उमेदवारांचे पॅनल जिंकले आणि भगवे झेंडे घेऊन हा परिसर शिवसैनिकांनी जल्लोषाने दणाणला होता. (प्रतिनिधी)पोलीसही ताटकळले...मतमोजणी सकाळी १० वाजता सुरू होणार होती; मात्र पोलिसांचा बंदोबस्त सकाळी ६ वाजतापासूनच लावण्यात आला होता. त्यामुळे आधीचे चार तास आणि मतमोजणी सुरू झाल्यानंतर सायंकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत म्हणजे सलग १२ ते १३ तास पोलिसांचा बंदोबस्त असल्यामुळे अधिकारी, कर्मचारी या ठिकाणी ताटकळले होते. अनेकांना तर जेवणही वेळेत न मिळाल्याने त्यांनी नाराजीही व्यक्त केली.