शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 02:58 IST

अकरावी प्रवेशाकरता जाहीर केलेल्या कट आॅफ लिस्टसह तांत्रिक समस्येमुळे शनिवारी प्रवेशाच्या शेवटच्या दिवशी हजारो विद्यार्थ्यांचे व पालकांचे हाल झाले.

- सुरेश लोखंडे ठाणे : अकरावी प्रवेशाकरता जाहीर केलेल्या कट आॅफ लिस्टसह तांत्रिक समस्येमुळे शनिवारी प्रवेशाच्या शेवटच्या दिवशी हजारो विद्यार्थ्यांचे व पालकांचे हाल झाले.कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या कट आॅफ लिस्ट व तांत्रिक समस्येमुळे विद्यार्थ्यांचे बेहाल असताना शासनाच्या बहुतांश केंद्रांवर मार्गदर्शनाकरता कुणीही प्रतिसाद देत नसल्याची तक्र्रार विद्यार्थ्यांनी केली. यामुळे पालकांची धावपळ झाली. ज्या विद्यार्थ्यांची नावे पहिल्या व दुसऱ्या यादीत आली नाहीत ते अगोदरच तणावात असताना तिसºया यादीतही त्यांची नावे आली नाहीत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी वेबसाइट उघडण्याचा प्रयत्न करूनही यश आले नाही. वेबसाइट ब्लॉक झाल्यामुळे ती उघडली नाही. पासवर्डही काम करत नव्हते, असे खारघर येथील पालक सुभाष कांबळे यांनी सांगितले. यामुळे शनिवारी शेवटच्या दिवशीदेखील त्यांची संधी हुकल्याचा मनस्ताप विद्यार्थी व पालकांना झाला.मात्र, शिक्षण विस्तार अधिकारी माळी यांच्याशी संपर्क साधला असता शेवटच्या विद्यार्थ्यास प्रवेश मिळेपर्यंत ही प्रक्रिया सुरूच राहील, असा दावा त्यांनी केला आहे.>वाणिज्यला मागणीजिल्ह्यातील वरिष्ठ व कनिष्ठ आदी सुमारे २६१ महाविद्यालयांमध्ये अकरावीचे आॅनलाइन प्रवेश घेतले जात आहेत. सुमारे एक लाख १२ हजार ९० जागा उपलब्ध आहेत. तर शहापूर, मुरबाड, भिवंडी ग्रामीण भागांतील आॅफलाइन प्रवेशासाठी १२ हजार ७६० जागा आहेत.ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, भार्इंदर आणि नवी मुंबई आदी शहरी भागांतील महाविद्यालयांमध्ये ९९ हजार ३३० विद्यार्थ्यांच्या आॅनलाइन प्रवेशाच्या जागा आहेत. कला शाखेत १२ हजार ९७० प्रवेश होतील. यामध्ये २०० प्रवेश विनाअनुदानित आणि ९७० स्वयंअर्थसहायित प्रवेशाचे आहेत.याप्रमाणेच वाणिज्य शाखेमध्ये सर्वाधिक प्रवेशासाठी ५३ हजार ९६० जागा आहेत. यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत यंदा चार हजार ४३० जागा वाढवल्या आहेत. यातील सुमारे ४४ हजार जागांवरील प्रवेश अनुदानित तुकड्यांमधील असून चार हजार विनाअनुदानित व स्वयंअर्थसहायित तुकड्यांमध्ये ९६० प्रवेश होतील.विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी यंदा ३२ हजार ४०० जागा आहेत. यातील ३० हजार जागांचे प्रवेश अनुदानित तुकड्यांमध्ये होतील. तर, दोन हजार २०० प्रवेश विनाअनुदानित आहेत. स्वयंअर्थसहायित २०० जागा आहेत.