शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

वैमानिकाने दाखविलेल्या सर्तकतेमुळे ठाण्यातील शिवसेनेचे सुमारे ४५ नगरसेवक सुखरुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 17:23 IST

दिल्लाला जाणाऱ्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते विमान पुन्हा मुंबईत उतरविण्यात आले. सुदैवाने या विमानातून दिल्लीला संसदेचे कामकाज पाहण्यासाठी जात असलेल्या ठाण्यातील ४५ शिवसेना नगरसेवक हे वैमानिकाने दाखविलेल्या सर्तकतेमुळे बचावले आहेत.

ठळक मुद्देसंसदेचे कामकाज पाहण्यासाठी निघाले होते नगरसेवकविमानात झाला होता तांत्रिक बिघाड

ठाणे - दिल्ली येथे संसदेचा दौरा करायला निघालेल्या ठाण्यातील शिवसेना नगरसेवकांचा जीव थोडक्यात बचावला आहे. सकाळी सव्वा दहाच्या दरम्यान गो एअर कंपनीच्या विमानाने मुंबई विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर ३५ ते ४० मिनिटांचे अंतर कापल्यानंतर विमानामध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता सावधगिरीचा उपाय म्हणून हे विमान पुन्हा मुंबई विमानतळावर उतरविण्यात आले. विमानामध्ये तब्बल ४० ते ४५ नगरसेवक आणि इतर पदाधिकारी प्रवास करत होते. प्रवास करत असलेल्या नगरसेवकांनी मुंबई विमानतळावर उतल्यावर सुटकेचा निश्वास सोडला. त्यानंतर त्यांना पुन्हा दुसऱ्या विमानाने दिल्लीला रवाना करण्यात आले.                   ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्यावतीने ठाण्यातील शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी यांच्यासाठी संसदेचे कामकाज कशा पद्धतीने चालते हे पाहण्यासाठी या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या अभ्यास दौऱ्यामध्ये ४० ते ४५ नगरसेवक प्रवास करत होते. स्वत: खासदार या विमानांमधून प्रवास करत नव्हते. तर शिवसेनेची एकही महिला नगरसेविका देखील सुदैवाने या विमानामध्ये प्रवास करत नव्हती.सकाळी विमानाने व्यविस्थत उड्डाण घेतल्यानंतर तब्बल ४० मिनिटांनी विमानामध्ये काही तरी बिघाड झाला असल्याची माहिती आम्हाला देण्यात आली. मात्र नेमका काय तांत्रिक बिघाड झाला आह यांची माहिती देण्यात येत नव्हती अशी प्रतिक्रिया या विमानामध्ये प्रवास करणारे शिक्षण समिती सभापती विकास रेपाळे यांनी दिली आहे. त्यानंतर एका इंजिनामध्ये बिघाड झाल्याने ते पुन्हा मुंबईत उतरविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. सुदैवाने वैमानिकाने वेळेत सतर्कता दाखवल्यामुळे आमचे प्राण वाचले असल्याचे त्यांनी सांगितले. तर अचानक तांत्रिक बिघाड झाला आहे एवढीच माहिती आम्हाला देण्यात आल्यानंतर पुन्हा मुंबईला उतरवण्यात आले असल्याचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी सांगितले.सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी देखील आपण या दौऱ्याला जाणार होतो, मात्र काही कामानिमित्त आपल्याला जाण्यास जमले नसले तरी या प्रकारची चौकशी होईल अशी अपेक्षा असल्याची प्रतिक्रि या त्यांनी दिली आहे. दरम्यान दुपारी पावणेतीनच्या दरम्यान हे सर्व नगरसेवक दिल्लीला पोचले असल्याची माहिती दौऱ्यातील नगरसेवकांनी दिली आहे. दरम्यान या संदर्भात या विमानाचे लँडीग एमरजेन्सी करण्यात आलेले नसल्याची माहिती गो एअर कंपनीकडून देण्यात आली आहे. केवळ सावधगिरीचा उपाय म्हणून विमान सुखरुपपणे पुन्हा मुंबईला उतरविण्यात आल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाShiv Senaशिवसेना