शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
2
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
3
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
4
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
5
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
6
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
7
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
8
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
9
VIDEO : टीम इंडियातील ब्युटीची 'मन की बात'; थेट PM मोदींना विचारला स्कीन केअर रुटीनसंदर्भातील प्रश्न
10
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
11
विश्वविजेत्या कन्यांचं Tata कडून खास सेलिब्रेशन...; संघातील प्रत्येक खेळाडूला देणार Sierra एसयूव्ही गिफ्ट! खास आहेत फीचर्स
12
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
13
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
14
Numerology: प्रत्येक स्त्री ही गृहलक्ष्मी असते; पण 'या' जन्मतारखेची स्त्री ठरते 'भाग्यलक्ष्मी'!
15
Physicswallah Ltd IPO: IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
16
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
17
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
18
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
19
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
20
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट

थकीत अनुदानामुळे आरटीई प्रवेशाचा तिढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 23:45 IST

राज्यभरातील शाळांसमोर मोठा पेच; ३०३ कोटी रुपयांचे अनुदान थकले

- मुरलीधर भवार कल्याण : आरटीई प्रवेशासाठी ज्या शाळा सरकारकडून निवडल्या गेल्या आहेत, त्या शाळांनी मागास व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना प्रवेश दिले आहेत; मात्र या प्रवेशापोटी २०१२-१३ या शैक्षणिक वर्षापासून आतापर्यंत जवळपास ३०३ कोटी रुपयांचे अनुदान सरकारकडून मिळालेले नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात अनुदान थकल्याने राज्यभरातील शाळांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.सरकारने राइट टू एज्युकेशन अर्थात आरटीई कायद्यान्वये मागास व आर्थिकदृष्ट्या दुर्बल पालकांच्या पाल्यांकरिता २५ टक्के प्रवेश आरक्षित ठेवले आहे. या विद्यार्थ्यांना शाळांनी प्रवेश दिल्यानंतर त्यांचे शुल्क व शालेय साहित्याचा खर्च सरकारकडून अनुदानस्वरूपात दिला जातो. त्यानुसार, २०१२-१३ मध्ये राज्यभरातील सुमारे दोन हजार ५०० शाळांमधून आरटीईअंतर्गत प्रवेश देण्यात आले. आजमितीस या शाळांची संख्या नऊ हजारांच्या घरात पोहोचली आहे. या शाळांमध्ये राज्यभरातून जवळपास एक लाख प्रवेश दिले गेले आहेत. २०१२-१३ च्या शैक्षणिक वर्षाच्या तुलनेत प्रवेशांचा आकडा वाढला आहे. या प्रवेशापोटी सरकारकडून २०१२-१३ ते २०१६-१७ पर्यंत ३०२ कोटी रुपये अनुदान मिळणे अपेक्षित होते. त्यापैकी सरकारने १५४ कोटी रुपये अनुदान दिले. उर्वरित १४८ कोटींचे अद्यापही अनुदान दिले गेले नाही. त्याचप्रमाणे २०१७-१८ मध्ये २९० कोटी रुपये अनुदान मिळणे अपेक्षित होते. मात्र, आधीचे १४८ कोटी आणि २०१७-१८ चे २९० कोटी असे एकूण ४३८ कोटी रुपये अनुदान थकले आहे.दरम्यान, थकीत अनुदान मिळत नसल्याने शाळांच्या वतीने संघटनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. अनुदान मिळत नसल्याने आरटीई प्रवेशाची प्रक्रिया थांबवण्यात यावी, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली होती. त्यानुसार, न्यायालयाने स्थगिती दिली होती. मात्र, त्यानंतर सरकारने न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्र सादर करून, ४३८ पैकी २१८ कोटी रुपयांचे अनुदान शाळांना दिले. उर्वरित २२० कोटींचे अनुदान १२ मार्चपर्यंत देण्याचे सरकारने मान्य केले होते. प्रत्यक्षात २०१८-१९ या सालाचे १५० कोटींचे अनुदानही थकले आहे. १२ मार्चपर्यंत २२० कोटी देण्याचे न्यायालयात मान्य करूनही त्याची पूर्तता सरकारने केली नसल्याचा आरोप इंडिपेण्डंट इंग्लिश स्कूल या संघटनेचे प्रदेश सचिव भरत भांदरगे यांनी केला. आता सरकारविरोधात अवमान याचिका दाखल करण्याची तयारी संघटनेने सुरू आहे. याशिवाय, चालू वर्षाचे १५० कोटी रुपये यासह सरकारकडे एकूण ३७० कोटी अनुदान थकीत होते. याबाबत, शाळांनी ओरड केल्यानंतर सरकारने चालू वर्षाच्या १५० पैकी ६७ कोटी वितरित केले. मात्र, अद्याप शाळांचे ३०३ कोटी थकीतच आहेत.६७ कोटींचे वितरणच नाही...शिक्षण खात्यातील अधिकारी ६७ कोटी सरकारने वितरित केल्याचे सांगत आहे.मात्र, जिल्हास्तरावरील अधिकारी हा निधी शाळांना देत नाहीत. शाळांकडून त्यांना १५ ते २० टक्के मलिद्याची अपेक्षा आहे. शाळांनी त्यासाठी नकार दिल्याने अधिकाऱ्यांनी प्रवेश तपासणीचा नवा प्रकार सुरू केला आहे. त्यात त्रूटी काढून शाळा व्यवस्थापनास त्रास दिला जात आहे. सरकारने दिलेला निधी शाळांना मिळणे अपेक्षित आहे. तो अधिकारी रखडवून ठेवतात, असा आरोप भरत भांदरगे यांनी केला.अर्थसंकल्पात ६५० कोटींच्या तरतुदीची आवश्यकता : आरटीई प्रवेशापोटी शाळांना सरकारकडून ३०३ कोटी रुपयांचे अनुदान मिळालेले नाही. दुसरीकडे प्रवेशांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सरकारने आरटीईकरिता अर्थसंकल्पात ५०० ते ६५० कोटी रुपयांची तरतूद करायला हवी. तरच, थकीत रकमेसह चालू वर्षाच्या तरतुदीचा प्रश्न निकाली निघू शकतो.पैशाला शाळा पात्र नाही, तर प्रवेशाला कशी?अनुदानाच्या मुद्यावर संघटनेने तत्कालीन प्रधान सचिव कृष्णा नायर यांची भेट घेतली होती. तेव्हा त्यांनी अनुदान मिळाले नसले, तरी प्रवेश थांबवता येणार नाही. मोफत शिक्षण हक्काचा कायदा असल्याने प्रवेश देणे शाळांना बंधनकारकच आहे. प्रवेशाची सक्ती करणाºया सरकारकडून अनुदान दिले जात नाही. अनुदानासाठी शाळा पात्र नाही, मग प्रवेशासाठी कशी पात्र ठरते, असा सवाल संघटनेचा आहे.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदा