शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे बळीराजाचे कंबरडे मोडले

By admin | Updated: November 24, 2015 01:36 IST

रविवारी रात्री तलासरी परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे या भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रात्री पडलेल्या पावसाची ३८ मिमी नोंद झाली.

तलासरी : रविवारी रात्री तलासरी परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे या भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रात्री पडलेल्या पावसाची ३८ मिमी नोंद झाली. अनियमित पावसामुळे शेतकऱ्यांचे पीक जेमतेम आले, त्यात भाताच्या उत्पन्नात घट आणि अशातच भातावर पडलेला रोग, यातूनही वाचलेल्या भातपिकाची कापणी करून ते शेतकऱ्याने शेतात टाकले. भाताच्या गंजीही शेतावर लावल्या होत्या. परंतु, रविवारच्या पावसामुळे कापून ठेवलेले भातपीक भिजून गेले. तलासरीत रविवारपासून ढगाळ वातावरण आहे. अचानक मुसळधार पाऊस आल्याने शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. भातपीक वाचविण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला, परंतु पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. (वार्ताहर)वाडा तालुक्यात रविवारी रात्री मुसळधार पाऊस पडल्याने भातशेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. कापणीचा खर्च करून वर आलेले धान्य भिजल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून त्यांना तत्काळ नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी वाडा तालुका राष्ट्रवादी काँगे्रसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पठारे यांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदाराकडे केली आहे. तालुक्यात अचानक अवकाळी पाऊस झाल्याने भातपीक, भाजीपाला, कलिंगड, वाल, हरभरा, तूर, मूग, उडीद, फुलझाडे, कांदा या पिकांचे नुकसान झाले आहे. या अस्मानी संकटामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. शेतीसाठी शेतकऱ्यांनी सहकारी सोसायट्या व बँकांकडून कर्ज घेतले आहे. त्याची परतफेड कशी करायची हा प्रश्न आहे.पावसाने भात पूर्ण भिजल्याने व्यापारी हे भातखरेदी करू शकणार नाहीत. त्यामुळे घेतलेले कर्ज फेडायचे कसे, या चिंतेत शेतकरी सापडला असल्याचे निवेदन नमूद केले आहे. दरम्यान, नुकसानीचे त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई द्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा पठारे यांनी प्रशासनाला दिला आहे. याबाबत, तालुका कृषी अधिकारी ए.बी. वारे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.