शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

वयाच्या जाचक अटीमुळे दाेन हजार  होमगार्ड्सवर आली उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 00:37 IST

कोरोनामुळे खबरदारी

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : गृहरक्षक दलातील (होमगार्ड) ५०हून अधिक वयोगटातील कर्मचाऱ्यांना कोरोनाचा धोका होऊ शकतो, असे गृहीत धरून राज्य सरकारने गेल्या १३ महिन्यांपासून बंदोबस्तासारखे काम देणे बंद केले आहे. त्यामुळे या दोन हजार कर्मचाऱ्यांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. वयाची ही अट शिथिल करून ठाणे जिल्ह्यातील शेकडो जवानांना पुन्हा कामावर रुजू करावे, असे साकडे या कर्मचाऱ्यांनी होमगार्डचे राज्याचे महासमादेशक परमबीर सिंह यांना घातले आहे.

ठाणे जिल्ह्यातील होमगार्डच्या जवानांनी महासमादेशकांना दिलेल्या आपल्या पत्रामध्ये म्हटले आहे की, होमगार्डचे जवान हे पगारी नोकर नाहीत. मानसेवी संघटनेत ते कार्यरत आहेत. परंतु, अनेकांची २० वर्षांहून अधिक सेवा झाली आहे. एकीकडे कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या कार्यकाळापासून संचारबंदीमध्ये पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून जिल्ह्यातील नऊ हजार ५००पेक्षा अधिक होमगार्डच्या जवानांनी सेवा दिली आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये नऊ हजार ५०० पैकी तब्बल दोन हजार जवानांना एकदाही काम देण्यात आले नाही. त्यांनी जिल्हा कार्यालयात विचारणा केली तर तिथे उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. तीन तीन महिने उशिराने भेटणाऱ्या मानधनावरच या जवानांचे संसार चालतात. पण आता तेही बंद झाले. 

एकीकडे कोरोनाकाळात अनेकांची कामे बंद झाली. सध्या दुकानेही बंद आहेत. त्यामुळे इतरत्र कुठेही काम किंवा खासगी नोकरीही करता येत नाही. कामच मिळत नसेल तर या जवानांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी जगायचे कसे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. जे शरीराने तंदुरुस्त असतील त्यांना तरी बंदोबस्ताची कामे दिली जावीत. ५०पेक्षा जास्त वयोगटातील असूनही पोलिसांना बंदोबस्त किंवा सर्व प्रकारची कामे दिली जात असतील तर हाच न्याय होमगार्डच्या जवानांनाही दिला जावा, अशी मागणीही या पत्रात केली आहे.

गेल्यावर्षी मार्चपासून रेल्वे, वाहतूक आणि शहरातील सर्व बंदोबस्तावरील ५०पेक्षा अधिक वयोगटातील होमगार्ड कर्मचाऱ्यांना काम देण्यात आलेले नाही. निवृत्तीपर्यंत सर्वांनाच कोरोनाच्या या कठीण काळात कामे दिली जावीत.- होमगार्ड जवान, ठाणे.