शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

उत्तन परिसरात हातभट्टीच्या दारुविक्रीमुळे कोळी महिलांसह बोटींचे नाखवा त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 19:05 IST

भार्इंदरच्या उत्तन भागात कायद्याने बंदी असलेली हातभट्टीची दारू सर्रास विकली जात असल्याने महिलांसह मासेमारी करणारे नाखवा सुद्धा त्रासले आहेत.

मीरा रोड - भार्इंदरच्या उत्तन भागात कायद्याने बंदी असलेली हातभट्टीची दारू सर्रास विकली जात असल्याने महिलांसह मासेमारी करणारे नाखवा सुद्धा त्रासले आहेत. कारण बोटींवर काम करणारे खलाशी बोटीवर कामासाठी न जाता-या गुत्त्यांकडे वळत असल्याने नाखवांची डोकेदुखी वाढली आहे. दुसरीकडे पोलिसांकडून कारवाई केली जात असली तरी दारू माफिया मात्र पोलिसांच्या नाकावर टिच्चून सर्रास पुन्हा आले गुत्ते चालवत आहेत.उत्तन परिसरात हातभट्टीच्या दारू विक्री विरोधात स्थानिक कोळी महिलांनी सतत कारवाईची मागणी चालवली आहे. या विरोधात मोर्चा व बैठका सुध्दा झाल्या आहेत. डॉ. महेश पाटील हे पोलीस अधिक्षक पद असताना त्यांनी हातभट्टीच्या दारु विरोधात धडक मोहिम चालवली होती. मोठ्या प्रमाणात दारुच्या हातभट्या तसेच गुत्ते उद्ध्वस्त केले होते. परंतु पोलीसांची कारवाई काहीशी मंदावल्याचे हेरून हातभट्टीवाले पुन्हा सक्रिय झाले आहेत. उत्तन नाका , नवीखाडी आदी भागात सर्रास हातभट्टीची दारु लहान बाटल्यां मध्ये विकली जात आहे. नवीखाडी येथील हातभट्टी दारू गुत्त्यावर रवीवारी व आज सोमवारी पोलीसांनी कारवाई केली.रविवारी केलेल्या कारवाई हातभट्टीच्या ३६ बाटल्या सापडल्या. तर स्थानिक मच्छीमार नेते मॅल्कम कासुघर यांनी केलेल्या तक्रारीवरून सोमवारी पोलिसांनी टाकलेल्या धाडीत हातभट्टीचा दारुसाठा जप्त करण्यात आला आहे. डिक नावाच्या चालकास पोलीसांनी अटक केली असुन अन्य एक आरोपी पळून गेला. पहाटे पासूनच हातभट्टीचे गुत्ते सुरु होत असल्याने खलाशी हे बोटीवर कामासाठी न जाता सरळ गुत्त्याकडे वळतात व मद्यपान करुन तर्रर होतात. या मुळे बोटींचे नाखवा त्रासले आहेत. तर गावठीदारु माफियांनी डोके वर काढल्याने महिला वर्ग सुध्दा संतप्त झाला आहे.लोकांनी तक्रार केल्यास पोलीसां कडुन कारवाई होते. पण सदरची कारवाई कुचकामी ठरत असल्याने प्रभावी कारवाई करण्याची मागणी नागरीक करत आहेत. उत्तन सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रवीणकुमार साळुंके यांनी सांगितले की, पोलिसांची कारवाई सतत सुरु असून, प्रतिबंधात्मक कारवाई सुध्दा विक्रेत्यांवर करत आहोत. मच्छीमारांनी सुध्दा हातभट्टीच्या दारुस प्रोत्साहन मिळेल अशी कृती करु नये असे आवाहन त्यांनी केले आहे.