शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उल्हास नदीच्या पुरामुळे १३ गावांचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 23:18 IST

एनडीआरएफने केली ७२ जणांची सुटका; कल्याण-मुरबाड- नगर वाहतूक पूर्णत: ठप्प

म्हारळ : पावसाच्या संततधारेमुळे उल्हास नदीच्या पुराच्या पाण्यामुळे उल्हास नदीलगतच्या म्हारळ, वरप, कांबा, पावशेपाडा, आपटी, मांजर्ली, दहागाव, पोई, केळणी, वाहोली, बापसई, मामनोली, रायते, दहिवली, चौरे, अंताडे आदी गावांचा संपर्कतुटला आहे. या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. कल्याण तालुक्यात पुरात अडकलेल्या ७२ जणांना एनडीआरएफ आणि महापालिकेच्या आपत्कालीन पथकाने सुरक्षित बाहेर काढले.बारवी धरणाच्या पाण्याच्या विसर्गामुळे रविवारी उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे पांजरापोळ आणि रायता येथील कल्याण-मुरबाड-नगरला जोडणारा पूल पाण्याखाली गेला. परिणामी, संपूर्ण वाहतूक बंद झाली. शनिवारी या मार्गावरील वाहने अन्य मार्गावरून वळवली होती. परंतु, सर्वच ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. परिसरातील १३ गावांचा संपर्क तुटला. तसेच ३० ते ४० गावांनाही पुराचा फटका बसला. अनेक गावांमधील भातशेतातही पाणी शिरल्याने शेती नष्ट झाली आहे.बारवी धरण भरण्याच्या मार्गावर असल्याने प्रशासनाने शनिवारी रात्रीच धोक्याच्या इशारा दिला होता. तसेच २६ जुलै २००५ च्या आठवणी जाग्या झाल्याने भीतीचे वातावरण होते. परिणामी, चिंतेने नागरिकांनी रात्र जागूनच काढली. पुराचे पाणी कल्याण-मुरबाड महामार्गावर आठ ते दहा फुटांपर्यंत वाढल्याने म्हारळ, कांबा, वरप परिसर जलमय झाला. कांबा येथील मोरयानगर येथील नागरिकांना कांबा येथील गावदेवी मंदिर, जिल्हा परिषद शाळा तसेच वरप येथील सेक्रेड हार्ट हायस्कूल येथे स्थलांतरित करण्यात आले.आणे येथील ग्रामस्थांनी पुन्हा शेजारील टेकडीवर जाऊन आश्रय घेतला. म्हारळ येथील सखल भाग पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. रायता गावातील १० ते १५ घरे पाण्यात बुडाली. शहाड येथील मोहना रोडवर आठ फूट पाणी साचल्याने लगतच्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. रस्त्यावरील मार्बलची दुकाने आणि लाकडाच्या वखारी पाण्यात बुडाल्या. मोहना रोडवरील बंदरपाडा येथील ६० घरे पाण्याखाली गेली. त्यामुळे तेथील रहिवाशांना शहाड येथील पाटीदार भवन आणि अन्यत्र हलवण्यात आले आहे. शहाड पुलाजवळील पेट्रोलपंपातही पाणी शिरले. वडवली येथील १५ ते २० घरे पाण्यात बुडाली.

टॅग्स :floodपूर