शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत महानगरपालिकेच्या तरण तलावात तरूणाचा बुडून मृत्यु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 23:50 IST

भिवंडी : शहरात धोबीतलाव येथील स्व.परशराम टावरे क्रिडा संकुलात असलेल्या महानगरपालिकेच्या तरण तलावात रविवारी दुपारी मित्रांसोबत पोहण्यास गेलेल्या युवकाचा ...

ठळक मुद्देमहानगरपालिकेच्या तरण तलावात तरूणाचा मृत्यूतरण तलावाचे व्यवस्थापन खाजगी संस्थेकडे सुरक्षा रक्षक नसल्याने तरूणाचा मृत्यू झाल्याचा आरोप

भिवंडी : शहरात धोबीतलाव येथील स्व.परशराम टावरे क्रिडा संकुलात असलेल्या महानगरपालिकेच्या तरण तलावात रविवारी दुपारी मित्रांसोबत पोहण्यास गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यु झाला. या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या तलावात बुडून मुलाचा मृत्यू झाल्याची ही दुसरी घटना आहे.फरमान खान (१९)असे तरण तलावात बुडून मृत्यू पावलेल्या मुलाचे नांव असून ते शहरातील भंडारी कंपाऊण्ड येथे रहात होता. तो रविवारी दुपारी मित्रांसोबत धोबीतलाव येथील महानगरपालिकेच्या तरणतलावात पोहोण्यास गेला असता त्यास खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलीसांनी दिली. महानगरपालिकेचे तरण तलावाचे व्यवस्थापन खाजगी संस्था सांभाळीत आहे. या पुर्वी पाण्यात बुडून एका मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडल्या नंतर मुलांना प्रशिक्षण देणारे शिक्षक व जीवन रक्षकांची नेमणूक करावी, असा आदेश सदर संस्थेला देण्यात आले होते. तरण तलावात दुपारच्या सुमारास फरमान खान हा युवक मित्रांसोबत पोहण्यास गेला असता तेथील पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. त्यावेळी तेथे जीवनरक्षक नसल्यानेच हि घटना घडली असून या घटनेस सर्वस्वी व्यवस्थापक व ठेकेदार संस्था जबाबदार असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे.फरमान खान हा एनसीसी कॅडेट होता व त्यास सैन्य दलात जाण्याची अपार इच्छा असल्याने त्याने सैन्य भरतीसाठी घेण्यात येणारी परीक्षा नुकतीच दिली होती. त्याचा निकाल लवकरच लागणार असल्याने तो आनंदित होता,अशी माहिती मृतांच्या नातेवाईकांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच भोईवाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सादिक बागवान यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह स्वर्गीय इंदिरा गांधी रु ग्णालयात शवविच्छेदना साठी रवाना केला आहे. सदर शवविच्छेदनानंतर आलेल्या अहवालानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीसांनी दिली.

 

टॅग्स :Bhiwandiभिवंडीdrowningपाण्यात बुडणे