शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सहा हजार ट्रकच्या संपामुळे जिल्ह्यात मालवाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 03:28 IST

देशभरातील ट्रक मालवाहतूकदारांनी सोमवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. यामुळे मालवाहतुकीवर परिणाम होणार आहे.

- सुरेश लोखंडे ठाणे : देशभरातील ट्रक मालवाहतूकदारांनी सोमवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. यामुळे मालवाहतुकीवर परिणाम होणार आहे. या संपाच्या कालावधीत ठाणे, नवी मुंबई परिसरातील सुमारे सहा हजार ट्रकची वाहतूक बंद राहणार आहे. सोमवार संध्याकाळपासून काही मालकांनी ट्रक जागेवर उभे केल्याचे पूनम ट्रक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे मालक सुनील भोंडिवले यांनी ‘लोकमत’ला सांगितले.आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस असोसिएशन (एआयएमआयसी) व आॅल इंडिया कॉन्फडरेशन आॅफ गुड्स व्हेइकल्स ओनर असोसिएशन (एआयसीजीव्हीओ) या संघटनांच्या नेतृत्वाखाली मालवाहतूक करणाऱ्या ट्रक्सच्या मालकांनी संपात सहभाग घेतला आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातीलसुमारे सहा हजार ट्रकमालकांचा सहभाग आहे. या संपातून जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीस वगळले आहे. तरीदेखील जिल्ह्यातील अन्य साहित्य वाहतुकीच्या बंदीमुळे बाजारपेठेवर परिणाम होणार असल्याचा अंदाज भोंडिवले यांनी व्यक्त केला.देशभरातील अन्य ठिकाणी गेलेल्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांना २० जूनपर्यंत ठिकठिकाणी उभे राहण्याची मुदत देण्यात आली आहे. मात्र, आमच्या गाड्या संध्याकाळीच आहे, त्या जागी उभ्या करण्यात आल्या आहेत. यामुळे मालवाहतुकीवर मोठा परिणाम होणार असल्याचे भोंडिवले यांनी स्पष्ट केले.>जीवनावश्यक वस्तूंना वगळल्याने परिणाम नाहीजिल्ह्यात देशपातळीवर सुमारे दोन ट्रान्सपोर्ट असोसिएशन सक्रिय आहेत. त्यांच्याकडून ट्रकमालकांवर दबाव येण्याची शक्यता आहे. या संपातून जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीस वगळण्यात आल्यामुळे आपल्याकडे त्यांचा फारसा परिणाम होणार नाही. तरीदेखील या संपाच्या कालावधीतील हालचालींवर लक्ष ठेवून असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील यांनी सांगितले.>आरटीओचे महामार्गांवरील वाहतुकीकडे लक्षयासंदर्भात आरटीओ अधिकारी जितेंद्र पाटील यांना विचारणा केली असता आज तरी काही परिणाम झालेला नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, आमची यंत्रणा महामार्गांवरील वाहतुकीवर लक्ष ठेवून आहे. हा संप काही दिवस सतत सुरू राहिल्यास वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सोमवारी पहिल्या दिवशी दिल्ली परिसरात ट्रक मालवाहतुकीवर परिणाम झालेला असल्याचा अंदाज पाटील यांनी व्यक्त केला.