शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

एक्स्प्रेसमध्ये मद्यधुंद कामगार; दोन सफाई कर्मचा-यांची प्रवाशांना दमदाटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 04:21 IST

कुर्ला टर्मिनस येथून निघालेली शालिमार एक्स्प्रेस ठाणे स्टेशनला येऊन थांबली. या प्रवासादरम्यान मद्यधुंद असलेल्या दोन सफाई कामगारांनी वेटिंग तिकीट असलेल्या व बाथरूमजवळील मोकळ्या जागेत बसलेल्या प्रवाशास दमदाटी करून हुज्जत घातली.

- सुरेश लोखंडेठाणे : कुर्ला टर्मिनस येथून निघालेली शालिमार एक्स्प्रेस ठाणे स्टेशनला येऊन थांबली. या प्रवासादरम्यान मद्यधुंद असलेल्या दोन सफाई कामगारांनी वेटिंग तिकीट असलेल्या व बाथरूमजवळील मोकळ्या जागेत बसलेल्या प्रवाशास दमदाटी करून हुज्जत घातली. एवढेच नव्हे तर त्याची बॅग हिसकावण्याचाही प्रयत्न केला. ठाणे स्टेशन सोडल्यानंतरही या कामगारांची दमदाटी सुरूच असल्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली.ठाणे येथून रात्री सुमारे १०.१५ वाजेदरम्यान ही गाडी कल्याणच्या दिशेने जात असताना या सफाई कामगारांनी प्रवाशाची बॅग हिसकावून फेकण्याचादेखील प्रयत्न केला.कल्याणपर्यंत तरी त्यांची ही दहशत सुरूच होती. कल्याणला उतरण्यासाठी काही जण आधीच दरवाजात आले. त्यांच्या ही मनमानी लक्षात आली. भीती वाटणाºया कामगारांचा अवतार पाहून कोणीही पुढे येऊन बोलण्यास तयार नव्हते. या वेळी काही जणांनी एकत्र येऊन ही मनमानी थांबवण्याचा प्रयत्न केला. रात्री-बेरात्री बाथरूमला येणाºया महिला प्रवाशांनादेखील या मद्यधुंद कामगारांचा त्रास होण्याची शक्यता लक्षात घेऊन संबंधित बोगीतील टीसी व स्टेशनमास्तरच्या निदर्शनात हा प्रकार आणून देण्यात आला.रेल्वेच्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधील बाथरूमसफाईसाठी खाजगी ठेकेदाराद्वारे सफाई कामगार नेमण्यात आले आहेत. पण, तसे फारसे उपयुक्तही ठरत नसलेल्या या कामगारांची दहशत मात्र जीवघेणी ठरत आहे. मद्यधुंद अवस्थेतील हे कामगार बोगीत रात्री-बेरात्री कारण नसतानाही हिंडत असतात. त्यांचे वर्तनही योग्य नसल्याचे आढळून येते. त्यांच्यातील काही कर्मचारी गुन्हेगारी प्रवृत्तीचे असण्याची दाट शक्यता आहे. या मद्यधुंद अवस्थेतील कामगारांपासून महिला प्रवाशांच्या जीवावर बेतण्याचा अतिप्रसंग व चीजवस्तू लांबवण्याच्या दुर्घटना होण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देण्याची अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.प्रवाशांत भीतीकल्याण स्टेशन येईपर्यंत या कामगारांचा धुमाकूळ सुरूच होता. ते मोठमोठ्याने आवाजही करत होते. ते कोणाचे ऐकूनही घेत नव्हते. बोगी क्रमांक-४ मधील हा प्रकार टीसींच्या निदर्शनात आणून दिला. यानंतर, त्यांनी संबंधित मुकादमाच्या लक्षात आणून दिले. यानंतर, या कामगारांना उतरवून देणे अपेक्षित होते किंवा जीआरपीच्या ताब्यात देणे गरजेचे होते. पण, कारवाई झाली नाही. यामुळे या प्रवाशांमध्ये भीती आहे.

टॅग्स :thaneठाणे