शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

बावनचाळीत अंमली पदार्थांचा व्यापार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:23 IST

डोंबिवली : अनैतिक धंद्यांचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बावनचाळीतील पडक्या वास्तुंलगतच्या परिसराचा वापर अमली पदार्थांच्या व्यापारासाठी होत असल्याचे विष्णुनगर ...

डोंबिवली : अनैतिक धंद्यांचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बावनचाळीतील पडक्या वास्तुंलगतच्या परिसराचा वापर अमली पदार्थांच्या व्यापारासाठी होत असल्याचे विष्णुनगर पोलिसांनी केलेल्या कारवाईतून समोर आले आहे. बावनचाळ परिसरातील रेल्वेग्राउंड असो, अथवा तेथील पडक्या, भग्नावस्थेतील वास्तूंच्या भागात बिनदिककतपणे दारूच्या पार्ट्या झोडल्या जात असताना आता गांजाच्या विक्रीसाठी आलेल्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे.

हा परिसर निर्जन असल्याने या ठिकाणी दिवसाढवळ्या, तसेच रात्री बिनदिक्कतपणे अवैध धंदे सुरू असतात. महाविद्यालयीन तरुण-तरुणी, प्रेमी युगुलांचा सकाळपासूनच या ठिकाणी राबता असतो. एकीकडे अश्लील चाळ्यांचे प्रकार सुरू असताना, दुसरीकडे एकट्या-दुकट्या जाणाऱ्या मुली, तरुणींचा विनयभंग, बलात्कार झाल्याचे प्रकार या ठिकाणी या आधी घडले आहेत. येथील मोडकळीस आलेल्या खोल्यांच्या परिसरात गांजाचा व्यापार जोमाने चालत असल्याची सूत्राची माहिती आहे. दरम्यान, शुक्रवारी मध्यरात्री पावणेदोन वाजता एक व्यक्ती गांजा हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत विष्णुनगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक गणेश वडणे यांच्यासह त्यांच्या पथकाने परिसरात सापळा लावला असता, एक व्यक्ती संशयितरीत्या फिरताना आढळला. ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे गांजा मिळून आला. समीर हरिश्चंद्र भोईर (वय ३२) असे त्याचे नाव असून, तो पश्चिमेकडील उमेशनगरमध्ये वास्तव्याला आहे. तो गांजा विक्रीठी आला होता. त्याच्याकडे एक किलो वजनाचा गांजा आणि काही रोख रककम आढळली. अटक करून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

------------------------------------------------------