शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

भांडारगृहात सडतायेत वाहने

By admin | Updated: February 25, 2017 03:08 IST

भिवंडी महापालिकेच्या कोंबडपाडा येथील भांडारगृहात काही वर्षापासून जुनी व नादुरूस्त वाहने सडत आहेत. यामध्ये एका अग्निशमन दलाच्या गाडीचा समावेश आहे

भिवंडी : भिवंडी महापालिकेच्या कोंबडपाडा येथील भांडारगृहात काही वर्षापासून जुनी व नादुरूस्त वाहने सडत आहेत. यामध्ये एका अग्निशमन दलाच्या गाडीचा समावेश आहे. त्याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.महापालिकेकडे एकूण ९१ वाहने असून त्यापैकी भांडारगृहात असलेल्या वाहनांपैकी २९ वाहनांचा लिलाव काढण्याच्या प्रक्रियेस सुरूवात झाली आहे. काही वर्षापासून भांडारगृहात सडत असलेल्या वाहनांकडे दुर्लक्ष केल्याने त्यांच्या अपेक्षित रक्कमही मिळणार नाहीत. या वाहनांमध्ये जास्त डम्पर व अ‍ॅम्बेसिडर गाड्यांचा समावेश आहे. या गाड्या वेळीच दुरूस्त करून त्या उपयोगात आल्या असत्या किंवा मुदतीत लिलाव केला असता तर त्याची विक्री रक्कम वाढली असती. परंतु याकडे दुर्लक्ष करत वाहन विभागाने पालिका पदाधिकाऱ्यांचे लाड पुरविण्यासाठी महागड्या गाड्या खरेदी करून आर्थिक संकटात ढकलले. मनपावर कर्ज असल्याचे निदर्शनास आणून मुदतबाह्य पालिकेच्या टँकरव्दारा शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. टँकर चालकाच्याशेजारी दरवाजा देखील नाही. याकडे नगरसेवक दुर्लक्ष करून काही पदाधिकारी दरमहा आवर्जून वाहनभत्ता घेत आहेत.नवीन पदाधिकारी जुन्या गाडीत बसण्यास तयार नसतात.त्यामुळे दहा वर्षात नव्या गाड्या खरेदी केल्या आहेत. दोन वर्षापूर्वी सुस्थितीत असलेले डम्पर अचानक बंद झाल्याने कारवाईसाठी डम्पर नसल्याची माहिती प्रभाग अधिकारी देतात. बऱ्याचवेळा पालिका आयुक्त अ‍ॅम्बेसिडरमधून तर पदाधिकारी महागड्या गाडीतून फिरताना दिसतात. पालिका क्षेत्रात फिरण्यासाठी पालिका अधिकारी कमी किमतीची वाहने खरेदी करणे आवश्यक असताना जास्त किंमतीची वाहने खरेदी केली जातात,असा आरोप काही माजी नगरसेवकांनी केला आहे. याची चौकशी झाली पाहिजे असेही या नगरसेवकांनी सांगितले. भांडारगृहात उभ्या केलेल्या वाहनांचे टायरही गायब झाले असून भांडारगृहात अग्निशमन दलाची गाडीही बंद अवस्थेत उभी आहे. पूर्वी पालिकेच्या गाड्या कमी पडतात म्हणून भाड्याने विविध वाहने व पाण्याचे टँकर घेऊन पालिकेवर आर्थिक बोजा टाकलेला आहे. मागील दहा वर्षात वाहन विभागात झालेल्या गैरव्यवहाराची आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी चौकशी करून भांडारगृहातील वाहनांचे सामान चोरीस कसे गेले?याचा तपास करावा आणि नंतरच वाहनांचा लिलाव करावा,अशी मागणी केली जात आहे. (प्रतिनिधी)