शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरमध्ये भर रस्त्यात डबके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 22:56 IST

रस्त्याचे काम अपूर्ण; नागरिकांना त्रास

उल्हासनगर : कॅम्प नं- २ रमाबाई आंबेडकरनगर येथील अर्धवट रस्त्यामुळे पाणी गळतीने भर रस्त्यात तळे निर्माण झाले आहे. डबक्यातून नागरिकांसह वाहनांना जावे लागत असून अपघात होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली.रमाबाई आंबेडकरनगरमध्ये रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम पालिकेने सुरू केले. मात्र संथ कामामुळे भररस्त्यात तळे साचले असून वाहनचालक व नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. पुढील तीन महिन्यांमध्ये काम पूर्ण करा असा आदेश बांधकाम विभागाचा असूनही संबंधित ठेकेदार, स्थानिक नगरसेवक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक करीत आहेत. रस्त्यावर खड्डे खणले असून पाणी साचून रस्त्यात डबके तयार झाले. शालेय विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक खड्ड्यात पाय घसरून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यांच्यावर जीव मुठीत धरून चालण्याची वेळ आलेली आहे.महापालिकेच्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली. शहरात एकीकडे डांबरीकरण सुरू असून दुसरीकडे अनेक रस्त्यांची काम अर्धवट आहेत. या प्रकाराने पुन्हा एकदा बांधकाम विभागातील सावळागोंधळ उजेडात आला आहे. १८ कोटींच्या निधीतून बांधण्यात आलेल्या शहाड ते महापालिका रस्त्याचे काम निकृष्ट झाले असून रस्त्याचे काम अद्यापही अर्धवट आहेत.