शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर उलगडले 'ड्रायव्हर' चे भावविश्व 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 16:08 IST

अभिनय कट्टा  ४५० व्या कट्ट्याकडे प्रत्येक रविवारी विशेष कलाकृतीचे धडाकेबाज सादरीकरण करत प्रत्येक पाऊल नवीन उत्साहात टाकत आहे.

ठळक मुद्देअभिनय कट्ट्यावर उलगडले 'ड्रायव्हर' चे भावविश्व कट्टा क्रमांक ४३९ वर मुकाभिनयातून विविध विषयांचे सादरीकरणआपली उपस्थिती आम्हाला आणखीन ऊर्जा देईल : किरण नाकती

ठाणे :  समाजात मनोरंजनातून प्रबोधन व्हावे ह्याची दक्षता अभिनय कट्टा आपल्या प्रत्येक कालाकृतीद्वारे घेत असतो. सामान्य व्यक्तीच्या आयुष्यातील संघर्ष आणि शिक्षणाचं महत्व ह्याची सांगड घालणारी एकांकिका म्हणजे अमोल साळवे लिखित आणि किरण नाकती दिग्दर्शित एकांकिका 'ड्रायव्हर '. आपले आयुष्य म्हणजे एक प्रवास त्यात अनेक अडचणी म्हणजे आपली गाडी पंक्चर होण्याची शक्यता असतेच. अशावेळी खचून न जाता जॅक लावून टायर बदलायचा आणि प्रवास जोपाने सुरू करायचा.हा पण ह्या गाडीच महत्वाचं चाक म्हणजे शिक्षण ते व्यवस्थित असणं खूप महत्वाचं. एक ड्रायव्हर ला सरकारी गाडी चालवण्यासाठी १० वी पास असणं गरजेचं म्हणून त्याच्या कुटुंबाची त्यासाठीची धडपड, त्या धडपडीला त्यांच्या स्वप्नांची जोडलेली नाळ आणि अपयश आला तरी पुन्हा नव्या जोमाने आयुष्याची सुरुवात करणार कुटुंब म्हणजे एकांकिका 'ड्रायव्हर'.           सदर एकांकिकेत ड्रायव्हरची भूमिका सहदेव कोळम्बकर,त्याच्या पत्नीची भूमिका रोहिणी थोरात , मुलीची भूमिका सई कदम आणि मास्तरांची भूमिका अभय पवार ह्यांनी साकारली.सदर एकांकिकेची प्रकाशयोजना आदित्य नाकती आणि संगीत संयोजन साक्षी महाडिक ह्यांनी सांभाळली.सादर एकांकिकेत ड्रायव्हर च्या घराचे नेपथ्य परेश दळवी ह्याने उभारले.कलाकारांची रंगभूषा दीपक लाडेकर ह्यांनी केली.सहदेव साळकर,महेश झिरपे ह्यांनी रंगमंच व्यवस्था सांभाळली आणि एकांकिकेचे पोस्टर निलेश भगवान ह्याने तयार केले होते. अभिनय कट्टा ४३८ ची सुरुवात मुकुंद निकते,मंगला निकते आणि सुनीता देशमुख ह्यांच्या शुभहस्ते करण्यात आली.सादर कट्ट्याचे निवेदन अभिनय कट्ट्याच्या कलाकार माधुरी कोळी ह्यांनी केले. सामान्य माणसाचं संघर्ष आणि शिक्षणाचं महत्व ह्याची सांगड घालणारी ड्रायव्हर ही एकांकिका खूप काही शिकवून जाते.आयुष्याचा प्रवास हा गाडीच्या गियर प्रमाणे जगण्याची गती बदलत करायचा असतो कधी कधी अपयशरूपी पंक्चर होत पण थांबायचं नाही जॅक लावून टायर बदलायचं आणि पुढील प्रवासाला सुरुवात करायची.शिक्षण हे मनुष्याच्या दैनंदिन आयुष्यात ताठ मानेने जगण्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि हेच सादर एकांकिकेतून मांडण्याचा प्रयत्न कलाकारांनी केला.आपले प्रेम आशिर्वाद सदैव पाठीशी असुदे हीच आमची नवनवीन कलाकृती सादर करण्यासाठीची ताकद आहे. कट्टा क्रमांक ४३९ वर अभिनय कट्ट्याचे कलाकार मुकाभिनयातून विविध विषयांचे सादरीकरण घेऊन येणार आहोत तर आपली उपस्थिती आम्हाला आणखीन ऊर्जा देईल असे मत अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांनी व्यक्त केले.

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक