शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

चालकांना लुटणारी चौकडी अटकेत

By admin | Updated: April 22, 2017 02:41 IST

कारचालकांना मारहाण करून त्यांना लुटणाऱ्या चार आरोपींना कापूरबावडी पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून चोरीच्या कारसह अन्य मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

ठाणे : कारचालकांना मारहाण करून त्यांना लुटणाऱ्या चार आरोपींना कापूरबावडी पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून चोरीच्या कारसह अन्य मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.कारचालकांना मारहाण करून त्यांना लुटण्याच्या घटना नजीकच्या काळात वाढल्या होत्या. त्याअनुषंगाने कापूरबावडी पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी हालचाली सुरू केल्या होत्या. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी बाळकुम परिसरात असल्याची गोपनीय माहिती कापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बन्सी बारावकर यांना मिळाली. त्यानुसार, अधिकाऱ्यांसह गुन्हे प्रकटीकरण पथकाने सापळा रचून चौघांना अटक केली. अक्षय ऊर्फ चिन्मय राजेश उगवेकर, विशाल ऊर्फ मोनू महेशप्रसाद सरोज, अर्जुन रविशंकर तिवारी आणि राजकुमार लोभाजी डोळे यांना शिताफीने अटक केली. सर्व आरोपी १९ ते २३ वर्षे वयोगटातील असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बन्सी बारावकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. आरोपींच्या अंगझडतीत चोरीचे मोबाइल फोन सापडले. तपासादरम्यान आरोपींकडून महत्त्वाची माहिती मिळाली. त्यानुसार, अक्षय उगवेकर याच्या घराची झडती घेतली असता ९ मोबाइल फोन, १ टॅबलेट, दोन कारटेप, मोठा सुरा असा ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येतील, असा विश्वास बारावकर यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)गुन्ह्यांच्या शैलीत साम्यकापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गत काही दिवसांत घडलेल्या लुटमारीच्या चार गुन्ह्यांची कबुली आरोपींनी दिली आहे. ४ एप्रिल रोजी पालघर येथील एका टॅक्सीचालकास माजिवडा भागात जबर मारहाण करून आरोपींनी ह्युंदाई एक्सेंट कारसह इतर ऐवज लुटला होता. सर्व तक्रारदारांच्या जबाबातून आरोपींचे वर्णन आणि गुन्ह्यांची शैली यात साम्य असल्याचे स्पष्ट झाले.