शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात १८ ते ४४ वयोगटासाठी ‘ड्राइव्ह इन’ लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:27 IST

ठाणे : शहरातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेची व्यापकता वाढविण्यासाठी ठाणे महापालिकेतर्फे आणि रेमंड कंपनी यांच्या सहकार्याने १८ ते ४४ ...

ठाणे : शहरातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेची व्यापकता वाढविण्यासाठी ठाणे महापालिकेतर्फे आणि रेमंड कंपनी यांच्या सहकार्याने १८ ते ४४ वयोगटासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘ड्राइव्ह इन’ लसीकरणाचा प्रारंभ शुक्रवारी राज्याचे नगरविकास मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला.

याप्रसंगी महापौर नरेश म्हस्के, उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समितीचे सभापती संजय भोईर, सभागृह नेता अशोक वैती, ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, आरोग्य परिरक्षण व वैद्यकीय साहाय्य समिती अध्यक्षा निशा पाटील, शिवसेना गटनेता दिलीप बारटक्के, राष्ट्रवादी गटनेता नजीब मुल्ला, नगरसेविका कल्पना पाटील, रेमंड ग्रुपचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया, उपायुक्त संदीप माळवी, आदी उपस्थित होते.

ठाणे महापालिकेतर्फे केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शहरातील १८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. परंतु, लसीकरणाच्या व्यापकता वाढावी, यासाठी रेमंड कंपनी येथे शुक्रवारपासून ‘ड्राइव्ह इन’ लसीकरण सुरू करण्यात आले. शुक्रवारी पहिल्याच दिवशी कोविशिल्डचे ३०० डोस देण्यात आले.

ऑनलाइन नोंदणी बंधनकारक

‘ड्राइव्ह इन’ लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक आहे. नोंदणी केलेल्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनाच लस देण्यात येत आहे. तसेच लसीकरणासाठी येताना सोबत चालक आणि आणखी एक काळजीवाहक म्हणून एक व्यक्ती सोबत असणे आवश्यक आहे. या केंद्रावर सकाळी ११ ते ४ या वेळेत लसीकरण सुरू राहणार असून, नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे.

---------------------