शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

पिण्याचे पाणी, शेतीला गंभीर धोका

By admin | Updated: July 5, 2017 06:19 IST

अंबरनाथच्या चिखलोली धरण परिसरात रासायनिक कचरा टाकल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर आता जीआयपी टँक परिसरातही अशाच प्रकारचा

लोकमत न्यूज नेटवर्क अंबरनाथ : अंबरनाथच्या चिखलोली धरण परिसरात रासायनिक कचरा टाकल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर आता जीआयपी टँक परिसरातही अशाच प्रकारचा कचरा टाकल्याचे समोर आले आहे. चिखलोली प्रकरणात कारवाई झाल्यावरही कंपन्यांना अजून धाक बसला नसल्याचेच यातून उघड झाले. या भागातील काही कंपन्या रासायनिक सांडपाणीही जमिनीत मुरवत असल्याचे उघड झाले असून त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत, शेती यांनाही गंभीर धोका निर्माण झाला आहे. अंबरनाथच्या अनंतनगर औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कारखानदारांनी त्यांच्या कंपनीतला कचरा हा प्रक्रिया केंद्रावर न टाकता एमआयडीसी परिसरातील मोकळ्या जागेवरच फेकणे सुरू केले. चिखलोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रासायनिक कचरा टाकल्याचा प्रकार समोर आल्यावर प्रदुषण नियंत्रण मंडळाने दोषी कंपनीवर कारवाईही केली. त्या घटनेला १५ दिवसही उलटत नाहीत, तोच पुन्हा या भागातील जीआयपी टँक परिसरात रासायनिक कचरा आढळला आहे. याची माहिती मिळताच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अभियंते आणि अ‍ॅडिशनल अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर असोसिएशनचे अध्यक्ष उमेश तायडे यांनी घटनास्थळी भेट देऊन कचऱ्याची पाहणी केली. येथे अनेक वर्षांपासून कचरा टाकला जात असल्याचेही यावेळी समोर आले. त्यामुळे या प्रकरणात एमआयडीसीने पुढाकार घेत कंपन्यांत जागृती करण्याचे आवाहन प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी धनंजय पाटील यांनी केले. कंपन्यांकडून वारंवार वेगवेगळ््या ठिकाणी टाकला जाणारा कचरा थांबवण्यासाठी त्यांना सूचना देऊन त्यांच्यासाठी एक विशिष्ट जागा देण्याचे आदेशही त्यांनी दिले. याबाबत विशेष कार्यक्र म राबवण्यासाठी कंपन्या, पालिका प्रशासन, एमआयडीसी, प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि समाजसेवी संस्थांना एकत्र बोलावून बैठक करण्याचेही आदेश त्यांनी दिले. येत्या सोमवारी याबाबत संयुक्त बैठक पार पडणार आहे. ही तपासणी सुरू असताना काही कंपन्या बेकायदा जमिनीत सांडपाणी मुरवत असल्याचे समोर आले आहे. याबाबत मंडळाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी करून पाण्याचे आणि कचऱ्याचे नमुने घेतले असून ते तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पिण्याच्या पाण्याला धोकाअंबरनाथ परिसरातील दोन धरणे रासायनिक कचऱ्याच्या विळख्यात सापडल्याने पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित होण्याचा धोका धडधडीतपणे समोर आला आहे. या पाण्याचे शुद्धीकरण होत असले, तरी त्यातून सर्व रसायने नष्ट होतील का, याबाबत साशंकता आहे. त्यामुळे सुरक्षा नसलेली धरणे आणि त्यांच्या परिसरात कोणाचाही होणारा वावर किती धोकादायक बनू शकतो, ते समोर आले.