शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पालघरमधील ८२ गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार; तातडीने कामाला गती द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 23:41 IST

पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

पालघर : पालघर जिल्ह्यातील बाडा पोखरण, धाकटी डहाणू परिसरातील ३० गावे, केळवे-माहीम परिसरातील २० गावे, उंबरपाडा-नंदाडे परिसरातील ३२ गावे अशा एकूण ८२ गावांसाठी नवीन पाणीपुरवठा योजनांची आखणी करून तातडीने कामाला गती द्यावी, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी बुधवारी अधिकाऱ्यांना दिले. यामुळे या गावांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या मार्गी लागण्यास मदत होणार आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नळपाणीपुरवठा योजनेसंदर्भात मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. त्या वेळी शिवसेना खासदार राजेंद्र गावित, जिल्हा परिषदेचे सदस्य जयेंद्र दुबळा, जिल्हाप्रमुख राजेश शहा, मजीप्रा ठाणे मुख्य अभियंता सुभाष भुजबळ तसेच अन्य अधिकारी या वेळी उपस्थित होते. जिल्ह्यातील उंबरपाडा नंदाडे व १७ गावे नळ प्रादेशिक पाणीपुरवठा योजना संयुक्त समितीमार्फत राबविण्यात येत आहे.

ही योजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्याची मागणी खा. गावित यांनी करीत धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने फेब्रुवारी-मार्च महिन्यात लोकांना कमी पाणीपुरवठ्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. तसेच या भागात नागरीकरण झपाट्याने वाढत असल्यामुळे नवीन योजनेची आवश्यकता भासत होती. या बैठकीत करण्यात आलेल्या मागणीच्या अनुषंगाने खडकोली बंधाºयातून जल जीवन मिशनमध्ये नवीन योजनेची आखणी करून प्रस्ताव सादर करावे, असे निर्देश पाणीपुरवठा मंत्री पाटील यांनी उपस्थित अधिकाºयांना दिले.

मोखाडा तालुक्यातील चास आणि गोमघर पाणीपुरवठा योजनेची कामे बंद असून ती त्वरित सुरू करण्याचे निर्देशही मंत्र्यांनी दिले. केळवे-माहीम व १८ गावे ग्रामीण पाणीपुरवठा योजनेत सध्या पाणीपुरवठ्याचे वितरण वारंवार खंडित होत असल्यामुळे तसेच जलवाहिन्या जुनाट व कमी क्षमतेच्या असल्याने पुरेसे पाणी मिळण्यास अडचण निर्माण होत आहे.डहाणूतील बाडा-पोखरण पाणीपुरवठा योजनेचे काम ९० टक्के पूर्ण झाले असून सतत फुटणाºया जलवाहिनीमुळे तसेच देखभाल व दुरुस्तीअभावी शेवटच्या टोकावरील गावांना नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने ही बाब उपस्थित ग्रामस्थांनी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिली. देखभाल व दुरुस्तीसाठी ही योजना पालघरच्या जिल्हा परिषदेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे हस्तांतरित करावी, असे निर्देश मंत्री पाटील यांनी या वेळी दिले. चंडिगाव ते धाकटी डहाणू गावातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी चिंचणी गावापासून स्वतंत्र पाइपलाइन किंवा नगरपालिकेच्या जलवाहिनीतून पाइपलाइन टाकणे, यापैकी एका पर्यायाची निवड करून त्याचा जल जीवन मिशनमध्ये समावेश करावा, असे निर्देशही या वेळी मंत्र्यांनी दिले.

टॅग्स :palgharपालघर