शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गटारे अपूर्ण ; मनपा सुस्तच

By admin | Updated: July 9, 2015 23:42 IST

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या ‘ब’ प्रभागक्षेत्र कार्यालयांतर्गत प्रभाग क्र. ३० कर्णिक रोड येथील घाटीबेडा मस्जीद गल्ली आणि शासकीय विश्रामगृह

अरविंद म्हात्रे  चिकणघरकल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या ‘ब’ प्रभागक्षेत्र कार्यालयांतर्गत प्रभाग क्र. ३० कर्णिक रोड येथील घाटीबेडा मस्जीद गल्ली आणि शासकीय विश्रामगृह व चर्चच्या मधल्या गल्लीत गटारांचे कामच झालेले नाही. तर नूतन विद्यालया समोरील गल्लीतल्या पायवाटांचे काम झाले नसल्याने तेथील वाट अद्याप मातीचीच आहे. नगरसेवकाचे आणि मनपाच्या ब प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्याचे येथे दुर्लक्ष झालेले आहे. हॉलीक्रॉस शाळेजवळील उपनिबंधक कार्यालय ते विठोबा कृपा सोसायटी, नीता अपार्टमेंटपासून ठाणगेवाडी व रामदासवाडीचा बराचसा भाग, पटवर्धन गल्ली, राणी लक्ष्मीबाई उद्यान परिसर, अतुलबाग, पोलीस वसाहत, जहांगीर मैदान परिसर सिंडीकेट, मुरबाड रोड आणि रेल्वे टॅ्रकच्या मधला संपूर्ण भाग, स्टेट बँक पर्यंत व तेथून ताडीपीटा, कर्णिक रोड, नूतन शाळेचा परिसर, मनपा आयुक्त बंगला ते यशवंतराव चव्हाण मैदान परिसर, डॉ. एकलहरे गल्ली असा बराचसा भाग यात समाविष्ट आहे. ठेकेदारांच्या मनमानीमुळे कामे अर्धवट असल्याने नागरीकांना त्रास होतो आहे.या प्रभागातून संतोषीमाता रोड आणि मुरबाड रोड हे दोन मुख्य रस्ते वर्दळीचे असून त्यांचे काँक्रीटीकरणाचे काम अर्धवट झाले आहे. उरलेल्या रस्त्यांचे खोदकाम थांबल्याने कामच बंद पडले आहे. पावसाळ्यात अशीच परिस्थिती राहणार असल्याची चिन्हे आहेत. रस्त्याच्या अपूर्णतेमुळे पदपथही बाधीत झाले आहे. या प्रभागात राणी लक्ष्मीबाई उद्यान चांगल्यापैकी विकसीत झालेले आहे. मात्र कर्णिक रोडवरील कल्पना चावला उद्यान विकासाच्या प्रतिक्षेत आहे. येथील सावंत बंगल्यासमोरच रस्त्याच्याकडेची गटारे उघडी आणि तुंबलेली आहेत. अंबरवडा समोरील चौकातील खड्डे वाहनांना अडथळे ठरत आहेत. अतुल बाग गल्लीच्या सुरुवातीलाच पायवाट उखडलेली आहे. या असुविधा मनपाचे अधिकारी आणि नगरसेवकाला दिसत नाही का? असा प्रश्न उपस्थित होतो. तो सुटेल कधी? याची चिंता स्थानिकांना आहे.