शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. तडवी यांच्या न्यायासाठी आज रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 00:35 IST

डोंबिवली : मागासवर्गीयांवर आणि अल्पसंख्याकांवर अ‍ॅट्रॉसिटी, हिंसाचाराचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. डॉ. पायल तडवी यांनीही अ‍ॅट्रॉसिटी, रॅगिंग आणि जातीय ...

डोंबिवली : मागासवर्गीयांवर आणि अल्पसंख्याकांवर अ‍ॅट्रॉसिटी, हिंसाचाराचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. डॉ. पायल तडवी यांनीही अ‍ॅट्रॉसिटी, रॅगिंग आणि जातीय छळवणुक ीमुळे आत्महत्या केली. त्याच्या निषेधार्थ कल्याण शहरातून विविध पक्ष, संघटना मंगळवारी हुंकार रॅली काढणार आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातून सायंकाळी ४ वाजता ही रॅली निघेल. शिवाजी चौक येथे तिचा समारोप होईल. तेथे श्रद्धांजली सभा होणार आहे. डॉ. पायल यांना न्याय मिळावा, यासाठी एकमुखी संदेश देण्यात येणार आहे. या रॅलीत शिक्षण, आरोग्य अधिकार मंच, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (सीपीआय), वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस (आय), राष्ट्रवादी काँग्रेस, आॅल इंडिया स्टुडंट फेडरेशन (एआयएसएफ), समता संघर्ष समिती, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, आरपीआय (सेक्युलर), संभाजी ब्रिगेड, आम आदमी पक्ष (आप), पंचशील मेडिकल असोसिएशन, रिव्होल्युशनरी मार्क्सिस्ट पार्टी आॅफ इंडिया, शेतकरी कामगार पक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समिती या संस्थांचा सहभाग असणार आहे.

शैक्षणिक संस्थेमध्ये जातीय छळवणुकीची बळी ठरलेल्या डॉ. पायल तडवी यांची आत्महत्या ही मनुवादी मनोवृत्तीचे आणि बाजारू शिक्षणव्यवस्थेचे फलित आहे. नायर रुग्णालयाशी संलग्न टोपीवाला महाविद्यालयातील वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमात आदिवासी मुस्लिम तडवी समाजातील या विद्यार्थिनीला जातीय छळवणुकीला कंटाळून आत्महत्येस प्रवृत्त केले होते. ही सार्वभौम, धर्मनिरपेक्ष, समाजवादी गणराज्यातील काळिमा फासणारी घटना आहे.

काही वर्षांपूर्वी हैदराबाद युनिव्हर्सिटीतील पीएच.डी.चा विद्यार्थी रोहित वेमुला यलाही जातीय छळवादाने आत्महत्येस प्रवृत्त केले होते. आरक्षित जागेवर प्रवेश मिळवलेल्या अनेक होतकरू आणि सक्षम मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अत्यंत हीन दर्जाची व अपमानास्पद वागणूक आजही दिली जात आहे. डॉ. तडवी यांना न्याय मिळावा, यासाठी ही रॅली काढण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण आरोग्य अधिकार मंचाचे अ‍ॅड. नितीन धुळे यांनी दिली.