शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. प्रशांत चौधरी यांना निलंबित करा, स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रेंचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 02:18 IST

कल्याण : डोंबिवलीतील सर्पमित्र भरत केणे याला सर्पदंश झाल्यावर त्याला उपचारासाठी महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, त्याच्यावर उपचार न करता त्याला पुढील उपचारासाठी अन्य सरकारी रुग्णालयात नेण्याचा सल्ला देत उपचारात हलगर्जी केल्याप्रकरणी डॉ. प्रशांत चौधरी यांना निलंबित करण्याचे आदेश स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे यांनी प्रशासनास दिले आहेत.महापालिकेच्या ...

कल्याण : डोंबिवलीतील सर्पमित्र भरत केणे याला सर्पदंश झाल्यावर त्याला उपचारासाठी महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, त्याच्यावर उपचार न करता त्याला पुढील उपचारासाठी अन्य सरकारी रुग्णालयात नेण्याचा सल्ला देत उपचारात हलगर्जी केल्याप्रकरणी डॉ. प्रशांत चौधरी यांना निलंबित करण्याचे आदेश स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे यांनी प्रशासनास दिले आहेत.महापालिकेच्या रुग्णालयांत सामान्य नागरिक उपचासाठी येतात. परंतु, त्यांना योग्य प्रकारे उपचार मिळत नाहीत. त्यांची तपासणी न करताच त्यांना पुढील उपचारासाठी कळवा रुग्णालय किंवा मुंबईत केईएम व जे. जे. रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला जातो. त्याचाच प्रत्यय सर्पमित्र केणे यांना आला. त्यांना उपचारासाठी नेले असता त्यांना उपचार न करता एक तास ताटकळत ठेवले. त्यानंतर पुढील उपचारासाठी अन्यत्र हलविण्याचा सल्ला दिला. वेळीच उपचार न मिळाल्याने केणे याचा मृत्यू झाला. नागरिकांच्या जीवाशी डॉक्टर व नर्स खेळत असल्याने सभापतींनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला.एका रिक्षा चालकालाही पिसाळलेला कुत्रा चावला होता. त्यालाही रेबिजचे इंजेक्शन असूनही दिले गेले नाही. याबाबत मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिता रोडे यांनी काय कारवाई केली. त्यांचा वचक राहिलेला नाही.रुग्णालयावर वर्षाला कोट्यावधी रुपये खर्च केले जात असतानाही नागरिकांना उपचार मिळत नाही. रुग्णालयात औषधे असूनही रुग्णांना बाहेरून ती घेण्याचा सल्ला दिला जातो. उपचारासाठी आलेल्या रुग्णांची हकालपट्टी करणाºया डॉक्टरांची हकालपट्टी करा, असा आदेश सभापती म्हात्रे यांनी दिला. त्याला नगरसेवक विकास म्हात्रे यांनी दुजोरा दिला. ते स्वत: रुग्णालयात उपाचारासाठी गेले असताना त्यांनाही तसाच अनुभव आला. तेथील नर्सने औषध आहे, पण ते कपाटात कुलूप बंद आहे. त्याची चावी नाही, असे उत्तर म्हात्रे यांना दिले.रुग्णालयातील औषधे रुग्णांना न देता बाहेर विकली जातात, असा आरोपही सभापतींनी या वेळी केला. सदस्याला अशी वागणूक मिळत असेल तर सामान्य रुग्णांची काय अवस्था असेल, असा प्रश्न अन्य नगरसेवकांनी उपस्थित केला. त्याचबरोबर पालिका रुग्णालयातील गोळीत तार सापडली होती. दरम्यान, या सगळ््या प्रकरणास डॉ. रोडे या देखील तितक्याच जबाबदार असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका