शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

डॉ. अन्सारी लढणार निवडणूक

By admin | Updated: May 13, 2017 00:48 IST

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरलेल्या समाजवादी पक्षाच्या तीन उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये निकाली काढल्याने

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरलेल्या समाजवादी पक्षाच्या तीन उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये निकाली काढल्याने त्यांनी उच्च न्यायालयाकडे दाद मागितली होती. त्यापैकी डॉ. नूर अन्सारी यांना निवडणूक लढविण्यास उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखविला आहे.समाजवादीचे उमेदवार सगीर बशीर खान यांनी प्रभाग क्रमांक १० क साठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांनी आॅनलाईन अर्जात क ऐवजी ब नमूद केल्याने छाननीच्यावेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज बाद केला होता. तर प्रभाग ९ मध्ये अर्ज दाखल केलेल्या अख्तर केबलवाला यांना तीन अपत्य असल्याप्रकरणी प्रतिस्पर्धी उमेदवाराने निदर्शनास आणून दिले. मात्र एका मुलाचे निधन झाले असून, त्याचा मृत्यूचा दाखला जमा करणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सांगूनही त्यांचा अर्ज बाद केला. काँग्रेस पक्षाच्या डॉ. नूर अन्सारी यांनी मागील निवडणुकीत काँग्रेस पक्षाने दिलेला व्हीप न पाळल्याने त्यांना सहा वर्षे निवडणूक लढविता येऊ नये म्हणून निलंबित केले होते. या निवडणुकीत अन्सारी यांनी समाजवादी पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केल्याने विरोधकांनी छाननीच्यावेळी हरकत घेतल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज बाद केला. त्यामुळे या तीन उमेदवारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यापैकी अन्सारी यांचा उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याने काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात ते उभे ठाकले आहेत.भाजपा खासदारांचा मुक्काम पद्मानगरमध्ये भिवंडी : निवडणुकीतील उमेदवार सुमीत पाटील याला निवडून आणण्यासाठी खासदार कपिल पाटील यांनी पद्मानगर भागात मुक्काम ठोकला आहे. प्रभाग क्रमांक १७ चे उमेदवार सुमीत पाटील हे खासदार पाटील यांचे पुतणे असून महापौरपदाचे दावेदार आहेत. त्यामुळे या भागातील अपक्ष उमेदवारांच्या समजूती काढणे व मंडळाच्या गाठीभेटी घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रभागात तेलगू समाजाचा कामगारवर्ग मोठ्या संख्येने राहतो. या समाजाचे नेतृत्व करणाऱ्या पंचाला ‘पेदामंची’ असे संबोधले जाते. त्यांना समाजाकडून मान मिळत असल्याने त्याची भेट घेत उमेदवार निवडून येण्याच्यादृष्टीने रणनीती आखली जात आहे. भाजपाचे शहराध्यक्ष संतोष शेट्टीही याच प्रभागात उभे असल्याने या प्रभागाकडे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे लक्ष असून शिवसेनेच्या उमेदवारासाठी आमदार रूपेश म्हात्रे हे स्वत: मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे येथील निवडणूक चांगलीच रंगणार असल्याचे चिन्हे दिसू लागली आहेत.फं्रटची याचिका फेटाळलीमतदारयादीतील घोळाबाबत भिवंडी डेव्हलपमेंट फ्रन्टने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होऊन ती निकालात काढली.दुबार व बोगस नावांबाबत उच्च न्यायालयाने निर्णय न दिल्याने तसेच त्याचा उल्लेख नसल्याने फ्रन्टच्यावतीने फाजील अन्सारी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. ही याचिका निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी दाखल होणे अपेक्षित होते. निवडणुकीत अशा समस्या असतात. परंतु निवडणूक जाहीर झाल्यानंतर विविध समस्यांवर अनेक तक्रारी दाखल होतील. त्यासाठी ही प्रक्रिया थांबविता येत नाही असे सांगत सर्वाेच्च न्यायालयाने याचिका निकालात काढली आणि उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला.