शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

हुंड्यासाठी छळ : विवाहितेची आत्महत्या, पतीस अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2017 20:51 IST

आॅनलाईन लोकमतठाणे, दि. पतीकडून ५० हजारांच्या हुंड्यासाठी वारंवार होणाऱ्या छळाला कंटाळून कांचन दुधियापथर (३०) या विवाहितेने पेटवून घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोलशेत येथे घडली. याप्रकरणी तिच्या भावाच्या तक्रारीनंतर पती सतीश दुधियापथर (३३) याला कापूरबावडी पोलिसांनी अटक केली आहे. तर, आईचा मृत्यू आणि वडिलांना तिच्या मृत्यूप्रकरणी अटक झाल्याने आठवर्षीय मुलगा आणि ...

आॅनलाईन लोकमतठाणे, दि. पतीकडून ५० हजारांच्या हुंड्यासाठी वारंवार होणाऱ्या छळाला कंटाळून कांचन दुधियापथर (३०) या विवाहितेने पेटवून घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोलशेत येथे घडली. याप्रकरणी तिच्या भावाच्या तक्रारीनंतर पती सतीश दुधियापथर (३३) याला कापूरबावडी पोलिसांनी अटक केली आहे. तर, आईचा मृत्यू आणि वडिलांना तिच्या मृत्यूप्रकरणी अटक झाल्याने आठवर्षीय मुलगा आणि पाचवर्षीय मुलगी ही दोन मुले मात्र पोरकी झाल्यामुळे कुटुंबीयांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.कांचन आणि सतीश या दोघांमध्ये नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे भांडणे होत होती. तो कचºयाच्या घंटागाडीवर, तर ती एक खासगी शाळेच्या बसवर मदतनीस म्हणून नोकरीला होती. माहेरहून ५० हजार रुपये आणण्यासाठीही तो तिला वारंवार धमकावत होता, अशी तक्रार तिचा उल्हासनगर येथील भाऊ शिवकुमार उज्जनवाल याने कापूरबावडी पोलिसांकडे केली आहे. कोलशेतच्या मरीआई चाळीत राहणारे हे दाम्पत्य २८ जुलै रोजी त्यांच्या पुतण्याच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला गायमुख, कासारवडवली येथे गेले होते. तिथून ते रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास घरी परतले. तेव्हाही त्यांच्यात पुन्हा किरकोळ वाद झाला. याच वादातून त्याने तिला शिवीगाळ करून मारहाणही केली. दारूचे व्यसन असलेल्या पतीकडून वारंवार होणाºया छळाला कंटाळून तिने अखेर रात्री ११.३० वाजण्याच्या दरम्यान अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. यात ती सुमारे ८० टक्के भाजली. तिला रबाळे, नवी मुंबई येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, ३१ आॅगस्ट रोजी रात्री तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त होऊन भाऊ शिवकुमार याने कापूरबावडी पोलिसांकडे तिला होणाºया छळाची कैफियत मांडून १ आॅगस्ट रोजी फिर्याद दाखल केली. या तक्रारीनंतर पती सतीशविरुद्ध हुंड्यासाठी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कापूरबावडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक एच.एस. चिरमाडे हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.