शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

...तर उद्योगांना दुप्पट दंड

By admin | Updated: April 25, 2016 02:59 IST

ठाणे जिल्ह्यातील उल्हास, वालधुनीसह इतर पाणीस्रोत प्रदूषित झाल्याने राष्ट्रीय हरित लवादाने जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना १०० कोटींचा दंड ठोठावला असताना

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील उल्हास, वालधुनीसह इतर पाणीस्रोत प्रदूषित झाल्याने राष्ट्रीय हरित लवादाने जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना १०० कोटींचा दंड ठोठावला असताना आता राज्यातील पाण्याच्या दर्जात वाढ करण्यासह त्याचे जतन करण्यासाठी राज्य्ाांच्या जलसंपदा विभागाने जलस्रोत प्रदूषित करणाऱ्या उद्योगांसह इतर घटकांना वठणीवर आणण्यासाठी आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. यानुसार, प्रत्येक उद्योगाने यापुढे नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहात सांडपाणी सोडण्यापूर्वी त्यावर पूर्ण प्रक्रिया केली नाही तर त्या उद्योगास दुप्पट दंड आकारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार प्रत्येक उद्योगाने नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहात सांडपाणी सोडण्यापूर्वी त्या पाण्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने घालून दिलेल्या नियमानुसारच त्यावर प्रक्रिया करून नंतर ते सोडावे, असे नमूद केले आहे. तसे न केल्यास मंडळाने घालून दिलेल्या दंडाच्या दुप्पट रक्कम आकारली जाणार आहे. जलसंपदा विभागाच्या क्षेत्रीय कार्यकारी अभियंत्यांनी त्यांच्या अखत्यारीतील औद्योगिक व वाणिज्यिक पाणी वापरकर्त्यांची यादी, त्यांचा मूळ मंजूर पाणीकोटा, पाण्याचा उद्भव याबाबतची माहिती त्यांच्या कार्यालयाजवळ प्रदूषण नियंत्रण मंडळास उपलब्ध करून द्यावी. जे उद्योग प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरवून दिलेल्या निकषानुसार प्रक्रिया केलेले पाणी नैसर्गिक पाणीस्रोतात सोडत नसतील तर त्यांची यादी मंडळाने जलसंपदा विभागाच्या संबंधित कार्यकारी अभियंत्यांना कळवणे बंधनकारक केले आहे. पाणी तपासणीत काही आढळल्यास त्या तारखेपासूनच दुप्पट आकारणी करावी तसेच त्या पाणीवापरकर्त्याचा पाणीपुरवठा खंडित करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने काढले असतील तर त्या ग्राहकांचा पाणीपुरवठा विभागाने तत्काळ खंडित करावा, असेही स्पष्ट केले आहे.