शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

मुरबाड तालुक्यात कोविड सेंटरचे दरवाजे बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:23 IST

मुरबाड : मुरबाड तालुक्यातील कोरोना रुग्ण हे प्राथमिक उपचारांनंतर कोविड सेंटरमध्ये दाखल होण्यासाठी बदलापूर, उल्हासनगर, ठाणे तसेच मुंबई या ...

मुरबाड : मुरबाड तालुक्यातील कोरोना रुग्ण हे प्राथमिक उपचारांनंतर कोविड सेंटरमध्ये दाखल होण्यासाठी बदलापूर, उल्हासनगर, ठाणे तसेच मुंबई या ठिकाणी भटकंती करत आहेत. स्थानिक ठिकाणी असणारे कोविड सेंटर सुरु करण्यात प्रशासनाला अपयश आल्याने आरोग्य प्रशासन रुग्णांची गणना तरी करणार काय, असा सवाल केला जात आहे.

जानेवारीपासून मुरबाडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना मागील आठवड्यात धसई येथे मायलेकराचा करुण अंत झाला. मुरबाडमध्ये रुग्णांचे प्रमाण कमी होत नसून किरकोळ उपचारांसाठी नागरिक खासगी रुग्णालयांमध्ये धाव घेत असले तरी ते महागडे उपचार परवडत नसल्याने सरकारी रुग्णालयांत उपचार घेण्यासाठी बदलापूर, उल्हासनगर किंवा ठाणे येथे भटकंती करावी लागते. यामुळे अनेक बाधित रुग्ण हे आजार अंगावर काढत असल्याने कोरोना संक्रमणात मोठ्या प्रमाणात वाढ होत असली तरी मुरबाड तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात असणारे कोविड सेंटर सुरू करण्यात आरोग्य प्रशासन चालढकल करीत आहे.

तालुक्यातील म्हसा, धसई, शिवळे सरळगाव, तुळई, शिरोशी, न्याहाडी, किशोर या प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच टोकावडे व मुरबाड ग्रामीण रुग्णालयात कोविड प्रतिबंधात्मक लस ही ४५ ते ६० वयाच्या नागरिकांना देण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत सुमारे ४३५८ नागरिकांना लस देण्यात आली आहे. मात्र तालुक्यातील बाधित नागरिकांना स्थानिक ठिकाणी कोविड सेंटर उपलब्ध नसल्यामुळे कोण, कुठे उपचार घेत आहेत याची आकडेवारी आरोग्य विभागाकडे नाही.

...............

मुरबाड ग्रामीण रुग्णालयात कर्मचारी व डाॅक्टर नसल्यामुळे अनेक विभाग बंद आहेत. त्यामुळे दररोज सुमारे तीनशे ते चारशे रुग्णांची ओपीडी आता पन्नासवर आलेली आहे. ग्रामीण रुग्णालयाचे ट्रामा केअर सेंटरमध्ये कोविड सेंटर सुरू होते. परंतु ते बंद करण्यात आले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी पुरेसा कर्मचारी वर्ग तसेच डाॅक्टर उपलब्ध करून दिल्यास तत्काळ कोविड सेंटर सुरू करता येईल. त्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर होईल.

- डाॅ. संजय वाठोरे, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, मुरबाड