शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सोनावणी नको रे बाबा!; नगरसेवकांची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 23:24 IST

विशेष अधिकारीपदी नेमण्याच्या हालचाली

उल्हासनगर : सेवानिवृत्त झालेले नगररचनाकार मिलिंद सोनावणी यांना विशेष अधिकारी पदावर नियुक्ती करण्याच्या घडामोडी महापालिका वर्तुळात सुरू आहेत. त्यांची एकूणच पार्श्वभूमी विचारात घेता सर्वपक्षीय नगरसेवक व नागरिकांनी सोनावणी नको रे बाबा अशी भूमिका घेत विरोध दर्शविला आहे.उल्हासनगर पालिकेचा नगररचनाकार विभाग नेहमीच वादात राहिला आहे. यापूर्वीच्या बहुतांश नगररचनाकारांना चुकीचे बांधकाम परवाने दिल्याप्रकरणी जेलची हवा खावी लागली असून ताराणी नावाचे नगररचनाकारांना लाच घेताना अटक झाली होती. तर संजीव करपे हे नगररचनाकार गेल्या तीन वर्षापासून बेपत्ता आहेत. तत्कालिन आमदार ज्योती कलानी यांनी एकाच दिवशी १६ पेक्षा जास्त बांधकाम परवाने दिल्याचा प्रश्न उपस्थित करून करपे कोंडी केली होती.यामध्ये प्रसिद्ध गृहसंकुलाचा समावेश आहे. सोनावण्ी यापूर्वी नगररचनाकार राहिले असून गॅस पंपाच्या परवान्यासाठी पैसे माागितल्याचा आरोप झाला होता. तसेच बांधकाम पूर्ण न झालेल्या वादग्र्रस्त गृहसंकुलांना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिल्याचा आरोप झाला होता.३१ जानेवारी रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर नगररचनाकार विभागाचा कारभार ठप्प पडला असून भिवंडी महापालिकेचे नगररचनाकार श्रीकांत देव यांच्याकडे प्रभारी पदभार दिला. मात्र देव महापालिकेत काम करण्यास इच्छुक नाहीत. तसेच राज्य सरकारने अध्यादेशानुसार बांधकाम नियमित करण्याची प्रक्रिया सुरू असून ती पूर्ण करण्यासाठी सेवानिवृत्त नगररचनाकार सोनावणी यांना मानधनावर विशेष अधिकारी म्हणून नियुक्त करण्याचा डाव काही नगरसेवक व पालिका अधिकाऱ्यांनी आखल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे.बांधकाम नियमित करण्याच्या प्रक्रियेत एका वास्तूविशारदाच्या बनावट सहीचे अर्ज आल्याने प्रक्रिया वादात सापडली आहे. सोनावणी यांची उल्हासनगर पालिकेतील एकूणच कारकिर्द वादग्रस्त ठरली असून, त्यांचे अनेकांना कटु अनुभव आल्याने त्यांच्या नेमणुकीस विरोध होत आहे.संभ्रम निर्माण होण्याची शक्यताराज्य सरकारच्या अध्यादेशानुसार बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया सुरू असून आॅनलाइन पध्दतीने अर्ज मागविले जात आहेत. १५ हजारापेक्षा जास्त अर्ज आॅनलाइनद्बारे आले असून त्यामध्ये काही अर्ज वास्तूविशारदाच्या बनावट सहीचे असल्याचे उघड झाले.या प्रकाराने प्रक्रिया वादात सापडली असून वादग्रस्त अधिकारी यांची विशेष अधिकारीपदी नियुक्ती केल्यास संभ्रम निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर