शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

"जलवाहतूक प्रकल्पातून ठाण्याला वगळू नका"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 23:52 IST

डॉ. श्रीकांत शिंदे यांची मागणी; खर्च कमी करण्याच्या केंद्राच्या धोरणावर टीका

ठाणे : केंद्र व राज्य सरकारच्यावतीने उभारण्यात येत असलेल्या जलवाहतूक प्रकल्पातून ठाणे शहराला वगळण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर शिवसेना खा. डॉ. श्रीकांत शिंदे नाराज झाले आहेत. केंद्र सरकारने कल्याण-ठाणे-वसई आणि कल्याण-ठाणे-मुंबई जलवाहतूक प्रकल्प मूळ स्वरुपात राबवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. प्रकल्पाचा मूळ आराखडा बदलून खर्चात कपात करण्याची तयारी केंद्राने चालवली असल्याचा आरोपही त्यांनी केला.ठाणे व त्यापुढील उपनगरांमधील लाखो प्रवाशांना वाहतुकीचे सुलभ साधन उपलब्ध व्हावे, यासाठी जलवाहतूक विकसित करण्यासाठी शिंदे सातत्याने केंद्र सरकारकडे गेली सहा वर्षे पाठपुरावा करीत आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि तत्कालीन बंदरविकास व जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या सूचनेनुसार ठाणे महापालिकेने पुढाकार घेऊन केंद्र सरकारपुढे सादरीकरण केले. गडकरी यांनी कल्याण-ठाणे-वसई या पहिल्या टप्प्यासाठी ६५० कोटी रुपये मंजूर केले होते.पहिल्या टप्प्याची अंमलबजावणी जेएनपीटीच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि ठाणे महापालिकेकडे देखरेख ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात येणार होती.शिंदे म्हणाले की, पहिल्या टप्प्यात १० जेट्टींचे बांधकाम, जलमार्गाचा विकास आणि प्रत्यक्ष वाहतूक यांचा समावेश होता. मात्र, आता केंद्राने यात बदल करत केवळ डोंबिवली, काल्हेर, कोलशेत आणि वसई या चार जेट्टींचे बांधकाम करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी येणाऱ्या निम्म्या खर्चाचा भार राज्य सरकारला उचलावा लागणार आहे. तसेच, प्रत्यक्ष जलवाहतूक पीपीपी तत्त्वावर करण्याचे प्रस्तावित असून महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाच्या माध्यमातून प्रकल्पाची अमलबजावणी होणार असल्याचे सोमवारी केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांच्यासमेवत झालेल्या बैठकीत स्पष्ट झाले.चार कोटी रुपये खर्चठाणे महापालिकेने या प्रकल्पाकरिता मेहनत घेतली असून जवळपास चार कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे आता या प्रकल्पातून महापालिकेला वगळणे योग्य नाही, असे मत शिंदे यांनी व्यक्त केले आहे.