शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

चिमण्यांच्या संवर्धनासाठी डोंबिवलीकर तरूणाची धडपड

By admin | Updated: May 12, 2014 01:23 IST

जान्हवी मोर्ये

जान्हवी मोर्येडोंबिवली - शहरातील चिमण्या वाचविण्यासाठी डोंबिवलीतील तरूण शैलेंद्र भगत याने पुढाकार घेऊन जनजागृती मोहिम हाती घेतली आहे. पर्यावरणातील अन्नसाखळी टिकून चिमण्या जगविणे हाच त्याचा मुख्य उद्देश आहे. नागरीकरणामुळे होणार वृक्षांची कत्तल, मोबाईल टॉवरची वाढती संख्येमुळे चिमण्यांच्या जिवितावर विपरित परिणाम असून त्यांना घरटी व चारा पाणी मिळत नाही. ही सगळी परिस्थिती लक्षात घेता महापालिकेने शहरात बांबू आणि बाभळीची झाडे लावावीत, विविध चौकांसह व मोक्याची ठिकाणी चिमण्यांसाठी दाणे व पसरट भांड्यात पाणी भरून ठेवावे, अशी मागणी त्याने महापालिकेचे उद्यान निरिक्षक संजय जाधव यांच्याकडे केली आहे़मोबाईल टॉवरच्या उत्सर्गामुळे (रेडीएशन) चिमण्यांसारखा लहानचा जीव धोक्यात आला आहे. कल्याण-डोंबिवली शहरात पाचशे पेक्षा जास्त मोबाईल टॉवर असल्याने शहरातील चिमण्यांच्या जीवितावर त्यांचा विपरीत परिणाम होत असल्याचे त्याने म्हटले आहे़लहानपणापासून पक्ष्याविषयी प्रेम असलेल्या शैलेंद्र हा सध्या एका खाजगी कंपनीत कामाला आहे. लहानपणी त्यांच्या आई-वडिलांनी त्यांच्यावर टाकलेल्या संस्कारातून तो दररोज चिमण्यांना पाणी व धान्याचे दाणे टाकत होता. दीड वर्षापूर्वी तो दिल्लीला काही कामानिमित्त गेला होता. त्यावेळी त्यांच्या वचनात पक्षी निरीक्षणाचा एक अहवाल हाती आला. त्यात पक्ष्यांची संख्या झपाट्याने वाढत चाललेल्या नागरिकरणामुळे रोडावत चालली आहे. त्याची माहिती त्याने गुगलवर ही घेतली. त्यानंतर त्याच्यातील पक्षीप्रेमी जागा झाला अन त्याने ही मोहीम हाती घेतली़यासंदर्भात एक घटना कथन करताना त्यांने सांगितले की, मागील महिन्यात रामनगर परिसरातील रस्त्यालगत येणारी झाडे कंत्राटदाराने तोडली. ही झाडे जुनी होती. त्यावर अनेक पक्ष्यांची घरटी होती. ती नष्ट झाली. पक्ष्यांचे घर उजाड झाले. तोडण्यात आलेल्या झाडांच्या बदल्यात कंत्राटदाराने दुसर्‍या ठिकाणी झाडे लावणे आवश्यक होते. त्याची पूर्तता कंत्राटदाराने केलेली नाही. चौकट :- रविवारी डोंबिवली पूर्वेतील मोर्विका साडी सेंटरवर चिमण्या वाचविण्यासाठी शैलेंद्र जनजागृती करणार आहे. या एकांड्या शिलेदाराच्या जनजागृतीला इतर पक्षी मित्रांची साथ मिळाल्यास ही मोहिम अधिक व्यापक होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा पक्षीप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.