शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत घुमला कबड्डीचा दम

By admin | Updated: December 22, 2016 05:38 IST

शहरातील शिवाई क्रीडा मंडळाने भरवलेल्या कल्याण तालुका आंतरशालेय कबड्डी स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत एकूण

डोंबिवली : शहरातील शिवाई क्रीडा मंडळाने भरवलेल्या कल्याण तालुका आंतरशालेय कबड्डी स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत एकूण पाच गटांमध्ये ८१ शाळांनी सहभाग घेतला.शिवाई बालक मंदिर शाळेच्या पटांगणात झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या हस्ते झाले. या वेळी विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर, सभागृह नेते राजेश मोरे, विनायक जोशी, शरद गंभीरराव, शालेय समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. शशिकांत ठोसर आदी उपस्थित होते. १६ व १९ वर्षांखालील मुले व मुलींचे चार गट तसेच १४ वर्षांखालील मुलांचा एक गट अशा एकूण पाच गटांमध्ये ही स्पर्धा झाली. विजेत्यांना आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू स्नेहल साळुंखे यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. विजेत्या मुलांच्या संघाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चषक, तर मुलींच्या संघाला सीमा ठोसर चषक देण्यात आला. आदर्श विद्यालयाची बाजी१४ वर्षांखालील मुलांच्या संघात निळजे येथील आदर्श विद्यालय विजयी, तर रतनबुवा पाटील उपविजयी ठरले. उत्कृ ष्ट चढाईसाठी शुभम कनोजिया (आदर्श विद्यालय), उत्कृष्ट पकड केतन पिसाळ (रतनबुवा पाटील), उत्कृष्ट खेळाडू आशीष शहाजी (आदर्श विद्यालय) यांनी पारितोषिके मिळवली. वेणूताई पावशे विद्यालय विजयी १६ वर्षांखालील मुलांच्या संघातून कल्याण येथील वेणूताई पावशे विद्यालय विजयी, तर कल्याण येतील मातोश्री गायकवाड शाळा उपविजयी ठरली. उत्कृष्ट चढाईसाठी शैलेश तर्डेकर (मातोश्री विद्यालय), उत्कृष्ट पकड म्हणून क्षितिज म्हात्रे (वेणूताई पावशे विद्यालय), उत्कृष्ट खेळाडू म्हणून मयूर घोलप (वेणूताई पावशे) यांना गौरवण्यात आले.मुलींमध्ये स्वामी विवेकानंद अजिंक्यमुलींच्या १६ वर्षांखालील गटातून स्वामी विवेकानंद, विष्णूनगर शाळा विजयी तर सर्वोदय विद्यालय, निळजे उपविजयी ठरली. उत्कृष्ट चढाईसाठी निकिता पाटील (सर्वोदय विद्यालय), उत्कृष्ट पकडीसाठी पूर्वा पाठारे (स्वामी विवेकानंद), तर उत्कृष्ट खेळाडू म्हणून धनश्री बऱ्हाटे (स्वामी विवेकानंद विद्यालय) यांना गौरवण्यात आले.१९ वर्षांखालील मुलांमधून मढवी महाविद्यालय (विजयी), तर संभाजीराव देशमुख शाळा उपविजयी ठरली. उत्कृष्ट चढाईसाठी राहुल दळवी (संभाजीराव देशमुख), उत्कृष्ट पकडीसाठी भूषण शिर्के (मढवी महाविद्यालय), तर उत्कृष्ट खेळाडू म्हणून शुभम सावंत (मढवी कॉलेज) यांना सन्मानित करण्यात आले. (प्रतिनिधी)