शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत पाण्याच्या मीटरची राजरोस चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 02:10 IST

घरफोडी आणि सोनसाखळीचोरीच्या घटना शहरात घडत असताना केडीएमसीच्या पाणीपुरवठा विभागाने सोसायट्यांमध्ये लावलेले पाण्याचे मीटरही मोठ्या प्रमाणावर चोरीला गेल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.

डोंबिवली : घरफोडी आणि सोनसाखळीचोरीच्या घटना शहरात घडत असताना केडीएमसीच्या पाणीपुरवठा विभागाने सोसायट्यांमध्ये लावलेले पाण्याचे मीटरही मोठ्या प्रमाणावर चोरीला गेल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. महिनाभरात ५० ते ६० मीटर चोरीला गेल्याची नोंद महापालिका दफ्तरी करण्यात आली आहे. याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यांमध्ये नागरिकांनी तक्रारअर्ज देऊनही मीटरचोरांचा थांगपत्ता लागलेला नाही. मुख्य म्हणजे पोलीस एफआयआर दाखल करून घेत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तसेच नवीन मीटरच्या खर्चाचा भुर्दंड आणि मीटर नसल्याने जादा बिले येण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

डोंबिवली पूर्वेतील गोग्रासवाडी, पेंडसेनगर, सारस्वत कॉलनी, खंबाळपाडा, बाबासाहेब जोशी मार्ग, राजाजी पथ या प्रमुख ठिकाणांसह बहुतांश ठिकाणच्या सोसायट्यांमधील पाण्याचे मीटर चोरीला गेले आहेत. पश्चिमेतही या चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. सहा महिन्यांत २५३ पाणीमीटर चोरीला गेली आहेत. या घटनांप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल झाल्या आहेत.

राजाजी पथावरील नंदादीप, शिवम कॉम्प्लेक्स, स्मृती जनार्दन, सुरज, आर्यभट्ट, दिनकर, कांचन, मल्हार या सोसायट्यांमधील पाण्याचे मीटर चोरीला गेले आहेत. राजाजी पथ परिसरात २० एप्रिलच्या मध्यरात्री ३० ते ४० मीटर चोरीला गेल्याची माहिती दिनकर बिल्डिंगमधील रहिवासी हेमंत ताम्हणे यांनी दिली. या वाढत्या घटना पाहता या चोरीच्या घटनांमागे एखादे रॅकेट तर नाही ना, अशी शंका स्थानिक नगरसेवक आणि केडीएमसीचे विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी व्यक्त केली.

महापालिकेच्या ‘ग’ प्रभागात एप्रिलमध्ये २९ मीटर, तर ‘फ’ प्रभागात चार मीटर चोरीला गेल्याचे अर्ज आल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. डोंबिवलीत चोरीच्या घटना गेल्या सहा ते सात महिन्यांपासून सुरू आहेत, पण अद्याप या मीटरचोरीच्या घटनांचा छडा लावण्यात स्थानिक पोलिसांना यश आलेले नाही. महापालिकेने त्या सोसायट्यांमध्ये नव्याने मीटरही बसवलेले नाहीत. यासंदर्भात ‘लोकमत’ने पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधला असता मीटर चोरीला गेल्याने नवीन मीटर बसवण्याबाबत संबंधितांचे अर्ज पालिकेकडे आले आहेत. त्याप्रमाणे कार्यवाही सुरू आहे. मीटर चोरीला गेल्याने सध्या पाण्याचे मोजमाप होत नसले, तरी त्यांना भरमसाट बिले पाठवली जाणार नाहीत. नवीन मीटर लावल्यानंतरच मोजमाप होईल, असा दावा त्या विभागाकडून करण्यात आला आहे.एफआयआर नोंदवण्यास टाळाटाळमीटर चोरीला गेल्याने संबंधित सोसायट्यांमधील सध्या किती प्रमाणात पाणी वापरले जाते, याची मोजदादच होत नाही. त्यामुळे केडीएमसीकडून भरमसाट पाण्याची बिले आकारण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे राजाजी पथावरील नंदादीप सोसायटीतील रहिवासी संदीप पाटील यांनी सांगितले. त्याचबरोबर तक्रार अर्ज घेताना पोलिसांकडून एफआयआर नोंदवून घेत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.