शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

डोंबिवली-ठाकुर्लीत ‘जंगलराज’

By admin | Updated: May 11, 2017 02:02 IST

ठाकुर्ली पूर्व, बालाजीनगर या नव्याने विकसित होत असलेल्या परिसरात नवीन इमारतीचे व घरातील इंटिरिअरचे काम करायचे असेल

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : ठाकुर्ली पूर्व, बालाजीनगर या नव्याने विकसित होत असलेल्या परिसरात नवीन इमारतीचे व घरातील इंटिरिअरचे काम करायचे असेल, तर दिलीप व शंकर भोईर या गुंडांनाच हे काम मिळाले पाहिजे, अशी भोईर कुटुंबांची भाईगिरी या भागात सुरू होती. मात्र, भोईर कंपनीच्या दारूच्या पार्ट्या झोडून आणि मटण-वड्यांवर ताव मारून मस्तवाल झालेल्या पोलिसांनी सातत्याने केलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याने किशोर चौधरी यांचा नियोजनबद्ध, निर्घृण खून झाला, अशी टीका या परिसरातील रहिवासी करू लागले आहेत.रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह पवार यांच्या कार्यकाळात गुंडगिरी वाढल्याने त्यांची बदली करण्याची मागणी आता शिवसेनेचे शहराध्यक्ष भाऊ चौधरी यांनी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडे केली. मात्र, कल्याण-डोंबिवलीच्या राजकारणावर वरचष्मा असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांना भोईर कंपनीच्या गुंडगिरीची कल्पना नव्हती, यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही. उलटपक्षी असे अनेक लोकल माफिया अन्य पक्षांइतकेच किंबहुना अधिक शिवसेना वर्षानुवर्षे पोसत आली आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.बालाजीनगरात बाहेरील व्यक्तीने येऊन कुठलेही छोटेमोठे काम केले, तर त्याला भोईर कुटुंबातील गुंड मारहाण करत होते. भोईर यांच्या दहशतीविरुद्ध कुणाकडून तक्रार आली नव्हती. मात्र, देवी शिवामृत बिल्डिंगमधील रहिवाशांनी तक्रार केली होती, अशी निलाजरी सारवासारव विजयसिंह पवार यांनी केली आहे. आता तर थेट गोळ्या घालून त्यांनी चौधरींना ठार मारल्याने बालाजीनगरातील या गुंडांची दहशत कित्येक पटीने वाढली आहे. भविष्यात या भोईर कंपनीच्या गुंडांना अटक होईल, ते जामिनावर सुटतील आणि चौधरी यांच्या हत्येच्या भांडवलावर टगेगिरी करत बालाजीनगरात दहशत पसरवत फिरतील, असे स्थानिक लोकप्रतिनिधींचेही म्हणणे आहे. कल्याण, डोंबिवली व ठाकुर्ली शहरांत मोठ्या प्रमाणात नवीन गृहसंकुले उभी राहत आहेत. ज्या परिसरात हा विकास होत आहे, त्या प्रत्येक परिसरात भोईर याच्यासारखेच गुंड, दादा अथवा भाई यांची दहशत आहे. या गुंडांनी आपले परिसर वाटून घेतले असून कुणी सीमोल्लंघन केले तर हाणामाऱ्या करणे, खूनबाजी करणे, हे त्यांचे उद्योग आहेत. विशिष्ट परिसरातील रेती-खडीपुरवठा करण्यापासून घराघरांतील केबल नेटवर्कपर्यंत आर्थिक नाड्या आपल्याच ताब्यात असल्या पाहिजे, असा या गुंडांचा खाक्या आहे. साधनशुचितेच्या बाता मारणारी भाजपा, मराठी माणसाच्या नावाने गळे काढणारी शिवसेना- मनसे, स्वाभिमानाच्या गप्पा करणारी राष्ट्रवादी या साऱ्यांनी हे गुंड वाटून घेतले आहेत. ते आज शिवसेनेत, तर उद्या भाजपात किंवा आज मनसेत, तर परवा राष्ट्रवादीत जातात. पालिका निवडणुकीत हेच गुंड आपली मुलेबाळे, सुना, भाऊ, जावई यांना उभे करून निवडून आणतात आणि स्थानिक राजकारणावरील व आर्थिक साम्राज्यावरील पकड घट्ट करतात. रस्त्यात कुठेही मोटारी उभ्या करून निघून जायचे, रात्रीअपरात्री कर्णकर्कश हॉर्न वाजवत मोटारी चालवायचे, दारू पिऊन हॉकीस्टीक-चॉपर घेऊन राडे करायचे, हेच उद्योग हे लोकल माफिया व त्यांनी पोसलेले बगलबच्चे करत असतात. या लोकल माफियांच्या दररोज रात्री होणाऱ्या पार्ट्यांमध्ये पोलीस, पालिका अधिकारी हजेरी लावत असल्याने लग्नाच्या हळदीत रात्री मोठ्याने लाऊडस्पीकर लावून यांनी धांगडधिंगा केला किंवा ट्रॅफिकमध्ये यांच्या एसयूव्ही गाड्यांवर अन्य वाहनचालकांकडून ओरखडा उठल्याने यांनी एखाद्याला बुकलले, तरी पोलीस त्याची दखलही घेत नाहीत.