शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मे महिन्यापर्यंत डोंबिवलीत पाइप गॅस?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 03:07 IST

केडीएमसीची परवानगी : कामाला सुरुवात

डोंबिवली : डोंबिवली परिसरात पाइप गॅस पुरवला जाणार असून नागरिकांची अनेक वर्षे प्रलंबित मागणी लवकरच मार्गी लागणार आहे. संथगतीने सुरू असलेल्या या प्रकल्पाच्या कामाला केडीएमसीने तांत्रिक परवानगी दिल्याने गती मिळणार आहे. मे महिन्यापर्यंत शहरातील बहुतांश भागात पाइप गॅसचा पुरवठा सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या सुविधेमुळे गॅस सिलिंडरच्या काळ्या बाजारातील विक्रीला आळा बसणार आहे.

पाइप गॅसच्या सुविधेसाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी पाठपुरावा केला. त्यानुसार, आतापर्यंत एमआयडीसी परिसरात काही ठिकाणी नागरिकांना लाभ मिळत आहे. पण, मध्यंतरी शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण झाले, त्यामुळे त्यानंतर पुन्हा तातडीने खोदकामाची परवानगी महानगर गॅसला महापालिकेने नाकारली. त्यामुळे काही महिने काम संथगतीने पुढे गेले. त्यानुसार, पुन्हा विविध पातळ्यांवरून त्यांना परवानगी मिळण्यासाठी प्रयत्न झाले. त्या खोदकामासाठी महानगरच्या प्रशासनाने महापालिकेला निधीही दिला होता. पण, तरीही परवानगीला विलंब झाला होता. महापालिकेने परवानगी दिल्याने ही अडचण दूर झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानुसार, आता शहरातील ठाकुर्ली परिसरातील पंचायत बावडी, सारस्वत कॉलनीच्या काही भागांत खोदकाम करायला सुरुवात झाली आहे. आगामी काळात मुख्य भागामध्ये ती लाइन टाकण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मे अखेरीस शहरातील बहुतांश भागात पाइप गॅसचा पुरवठा सुरू होणार आहे.मग परवानगी का रोखली?च्महानगर गॅस खोदकामासाठी पालिकेकडे विशिष्ट निधी वर्ग करतो. त्याची आकडेवारी कोट्यवधींमध्ये असते. पण, तरीही महापालिकेने परवानगी का रोखून धरली, असा प्रश्न विचारला जात आहे.च्तसेच ‘महानगर’ने जो निधी दिलेला असतो, तो खोदकाम झाल्यावर पुन्हा रस्तेदुरुस्ती अथवा पॅचकाम करण्यासाठीच वापरला जातो का, असा सवालही जाणकरांनीउपस्थित केला. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाthaneठाणे