शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवली महापालिका हवी; मान्यवरांनी वेधले राज्यमंत्र्यांचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 00:38 IST

समस्यांमध्ये वाहतूककोंडी, फेरीवाले, रिक्षाचालकांचा बेशिस्तपणा, कोपर उड्डाणपूल, रस्त्यांची दुरुस्ती याकडे लक्ष वेधताना प्रशासकीय यंत्रणांमधील समन्वयाच्या अभावाचा मुद्दा येथे प्रकर्षाने मांडला.

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली या शहरांची संस्कृती भिन्न आहे. वाढत्या नागरिकीक रणामुळे मूलभूत सुविधांचा सध्या पुरता बोजवारा उडाला आहे. त्यामुळे वाढती लोकसंख्या पाहता डोंबिवलीची स्वतंत्र महापालिका व्हावी, अशी मागणी मान्यवरांनी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली. शनिवारी येथील ब्राह्मण सभागृहात चव्हाण यांनी शहरातील सामाजिक संस्था, मान्यवर यांची विशेष बैठक बोलावली होती. त्या बैठकीत शहरातील समस्यांकडे लक्ष वेधताना ही मागणी करण्यात आली.

चव्हाण यांनी नगरसेवक ते आमदार या आतापर्यंतच्या कारकिर्दीत शहरात कोणकोणते उपक्रम राबवले तसेच भविष्यात हाती घेतल्या जाणाऱ्या योजनांची माहिती देण्यासाठी तसेच उपस्थितांच्या सूचना आणि मार्गदर्शनासाठी ही बैठक आयोजित केली होती. यावेळी चव्हाण यांच्यासह मधुकर चक्रदेव, ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर, दीपक मेजारी, स्नेहल दीक्षित, दर्शना सामंत, माधव जोशी, विवेक पंडित आदी उपस्थित होते. व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांनी शहरात भेडसावणाºया समस्या मांडताना ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली. समस्यांमध्ये वाहतूककोंडी, फेरीवाले, रिक्षाचालकांचा बेशिस्तपणा, कोपर उड्डाणपूल, रस्त्यांची दुरुस्ती याकडे लक्ष वेधताना प्रशासकीय यंत्रणांमधील समन्वयाच्या अभावाचा मुद्दा येथे प्रकर्षाने मांडला. यावेळी नगरसेवकांच्या प्रभागातील कामकाजाबाबतही नाराजी व्यक्त केली. त्यांना जे चांगले वाटते तेच करतात, पण नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतात. नागरिकच सेवक झाले असल्याची भावना व्यक्त करण्यात आली, तर श्रेयवादाचा मुद्दाही यावेळी मान्यवरांकडून मांडण्यात आला. सावित्रीबाई फुले कलामंदिर लवकर सुरू व्हावे, अशीही मागणी करण्यात आली. दरम्यान, लोकसभेला डोंबिवलीतून मतदान कमी झाले. येथून भरभरून मतदान झाले पाहिजे. मतदारयादीत नाव आहे की नाही, याचीही दक्षता घ्यावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

‘समस्यांचे लवकरच निराकरण होईल’शहरात पहिले नागरिकीकरण झाले, मग पायाभूत सुविधांचा विचार केला गेला. सध्या कल्याण-शीळ मार्गावरील प्रस्तावित पलावा, पत्रीपुलाचे काम लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न राहणार आहे. जोशी हायस्कूल येथील उड्डाणपूल, ठाकुर्ली ९० फुटी रस्त्यावर एलिव्हेटेड स्वरू पात उतरवला जाणार आहे. मोठागाव-माणकोली उड्डाणपुलाचे कामही सुरू आहे. रिंगरूटच्या कामाला गती येणार आहे. दुर्गाडीच्या कामातही सरकारने विशेष लक्ष वेधले आहे. त्यामुळे लवकरच शहराची वाहतूककोंडीतून मुक्तता होईल, असा दावा चव्हाण यांनी केला. रेल्वेतील सरकते जिने तसेच फलाटांची उंची वाढवणे, ही कामे माझ्याच पुढाकाराने झाली. नागरी सुविधा, आरोग्य सुविधाही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. कल्याण ग्रामीणमध्ये प्रस्तावित ग्रोथ सेंटरच्या माध्यमातून आयटी क्षेत्रातील ५० हजार मुलांना रोजगार मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शहराबाबत नेहमीच सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे. डोंबिवली शहर हे चांगले आहे, असेच म्हटले पाहिजे, असेही चव्हाण म्हणाले.

उद्धव ठाकरे यांना विसरबालभवनच्या शुभारंभप्रसंगी उद्धव ठाकरे यांनी येथे तारांगण उभारण्याचे आश्वासन दिले होते. तर, मनोहर जोशी हे मुख्यमंत्री असताना शहराची लोकसंख्या चार लाखांच्यावर गेल्यावर डोंबिवलीची महापालिका होऊ शकेल, असे सांगितले होते. पण, त्याचा विसर पडल्याचा मुद्दाही मान्यवरांनी मांडला.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका