डोंबिवली: वाहनचालकांचे असंख्य प्रश्न, दुरुत्तर यांमुळे डोंबिवलीत हेल्मेट सक्ती मोहीम बारगळली. शहर वाहतूक नियंत्रण विभागाने वाहनचालकांच्या उद्दामगिरीला कंटाळून ही मोहीम यशस्वी होणार नसल्याचा अंतर्गत निर्णय घेतला.हेल्मेट सक्ती केली की ती आम्हालाच का पकडले, अवैध वाहतूक करणारे, नियमांचे उल्लंघन करुन रिक्षामध्ये पुढची फोर्थ सीट घेणा-यांवर काय कारवाई केली जाते अशा प्रकारचे प्रश्न विचारुन कारवाईमध्ये गेले दोन दिवस काहींनी बाधा आणली. खर तर अशांवर सरकारी कामात अडथळा या कायद्यांतर्गत कारवाई होऊ शकते, पण तसा पवित्रा वाहतूक पोलीसांनी घेतलेला नाही. पण तरीही हेल्मेट सक्तीची कारवाई करता येणे शक्य नसल्याच्या निर्णयाप्रत पोलीस यंत्रणा आल्याची माहिती सूत्रांनी दिली.सोमवारपासून ही सक्ती करण्यात आली होती, त्याला शुभारंभापासूनच नागरिकांनी विरोध केला होता. सोशल मीडियावर देखिल मार्च महिना इयर एंडींग आले म्हणुन अशा कारवाया केल्या जात असल्याचे सांगत टिकेची झोड उठवण्यात आली होती. तरीही ९० फीट रोड, खंबाळपाडा, शेलार नाका, आदी ठिकाणी वाहतूक पोलीसांनी कारवाई केली, सोमवारी सुमारे २५ दुचाकी स्वारांवर दंडात्मक कारवाई झाली होती. पण मंगळवार, बुधवारमध्ये त्यास प्रचंड विरोध झाला. अखेरीस विरोधामुळे ती मोहीम फारशी यशस्वी होणार नसून वाहनचालकांना शिस्त नको असल्याची नाराजी पोलीस यंत्रणेने व्यक्त केली.
डोंबिवलीत हेल्मेटसक्ती मोहीम बारगळली : वाहतूक पोलीसांना झाला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 13:22 IST
वाहनचालकांचे असंख्य प्रश्न, दुरुत्तर यांमुळे डोंबिवलीत हेल्मेट सक्ती मोहीम बारगळली. शहर वाहतूक नियंत्रण विभागाने वाहनचालकांच्या उद्दामगिरीला कंटाळून ही मोहीम यशस्वी होणार नसल्याचा अंतर्गत निर्णय घेतला.
डोंबिवलीत हेल्मेटसक्ती मोहीम बारगळली : वाहतूक पोलीसांना झाला विरोध
ठळक मुद्दे अवघ्या दोन दिवसात मोहिमेला हारताळ