शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवली बस स्थानकावरुन शिवसेना-मनसेमध्ये जुंपली

By admin | Updated: May 10, 2017 00:12 IST

असुविधांच्या विळख्यातून डोंबिवलीचे बस स्थानकाला बाहेर काढावे आणि प्रवाशांच्या मागणीनुसार डोंबिवली-पुणे ही बससेवा सुरु करावी

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : असुविधांच्या विळख्यातून डोंबिवलीचे बस स्थानकाला बाहेर काढावे आणि प्रवाशांच्या मागणीनुसार डोंबिवली-पुणे ही बससेवा सुरु करावी, यासाठी मंगळवारी मनसे आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी डोंबिवली बस स्थानकाचा पाहणी दौरा केला आणि दोन्ही पक्ष आमने-सामने आले. त्यांच्या बस स्थानक व प्रवाशांना सुविधा पुरविण्याच्या मागणीवरुन चांगलीच जुंपली. आम्ही पाहणी करणार असतानाही मनसेने घुसखोरी केल्याचा आरोप शिवसेनेने केला, तर सत्तेत असताना, त्या खात्याचे मंत्रीपद हाती असताना पाहणी कसली करता, निर्णय घ्या, असे उत्तर मनसेने दिल्याने हा प्रश्न तापला. ‘लोकमत’च्या ‘रिपोर्टर आॅन द स्पॉट’ या मालिकेअंतर्गत डोंबिवली, कल्याण आणि विठ्ठलवाडी आगाराचे प्रश्न मांडण्यात आले होते. त्याची दखल सर्वच राजकीय पक्षांनी घेतली आणि डोंबिवली-पुणे बससेवा तत्काळ सुरू करण्याची मागणी केली. तिन्ही बस स्थानकातील गैरसोयी दूर करण्यासाठी सर्व पक्षांकडून पाठपुरावाही केला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नेत्यांनी मंगळवारी पाहणी करणार असल्याचे सांगितले. मात्र मनसेचे शहराध्यक्ष मनोज घरत यांच्यासह प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम, पदाधिकारी सागर जेधे व रविंद्र गरुड यांनी सकाळीच डोंबिवली बस स्थानकात धाव घेतली. त्या पाठोपाठ शिवसेनेचे शहर प्रमुख भाऊ चौधरी यांच्यासह विधानसभा संघटक तात्या माने, उपविभागप्रमुख सतीश मोडक, शाखाप्रमुख आमोद वैद्य यांनीही बस स्थानकात प्रवेश केला. मनसेपाठोपाठ शिवसेनेचे पदाधिकारी येताच दोन्ही पक्ष आमने-सामने आले. आम्ही पाहणी करणार जाहीर केले होते, तरीही मनसेने घुसखोरी केल्याचा आरोप चौधरी यांनी केला. डोंबिवली स्टेशनपर्यंत बस येणे गरजेचे : चौधरी-स्थानकाची पाहणी करण्यासाठी पोहचलेले शिवसेनेचे शहरप्रमुख भाऊ चौधरी यांनी सांगितले, स्थानकाची संरक्षक भिंत काही पडली आहे. पाणपोई बंद आहे. असुविधा आहेत. रात्रीच्या वेळी बसेस डोंबिवली स्टेशन परिसरात ला येतात. तशाच त्या इतर वेळीही येणे गरजेचे आहे. बस स्थानकाच्या सोयी सुविधांविषयी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेचे माजी नगरसेवक व विधानसभा संघटक तात्या माने पाठपुरावा करीत आहेत. शिवसेना पुन्हा निवेदन देऊन पाहणी करणार असल्याचे शिवसेनेने जाहीर करताच त्याठिकाणी मनसे घुसखोरी करण्यासाठी पोचल्याचा आरोप चौधरी यांनी केला. अद्याप पत्रव्यवहार नाहीराष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने या विषयावर पत्रव्यवहार करण्याचे जाहीर केले. पण अजून तो कोणीही केलेला नाही. विरोधी पक्षाच्या भूमिकेतून मनसे जोसकसपणे पुढे येत आहे. पण शिवसेना सत्तेत असून विरोधकांची भूमिका बजावत आहे. ती संधी त्यांनी आम्हाला द्यावी, असा टोला मनसेने लगावला आहे.