शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत आवक ३० टक्के घटली

By admin | Updated: June 2, 2017 05:39 IST

शेतकरी संपाच्या पहिल्या दिवशी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीला झळ लागली नसली, तरी उद्या शुक्रवारपासून भाजीपाल्याची

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : शेतकरी संपाच्या पहिल्या दिवशी कल्याण कृषी उत्पन्न  बाजार समितीला झळ लागली  नसली, तरी उद्या शुक्रवारपासून भाजीपाल्याची आवक रोडावली, तर भाजीपाल्याच्या दरात १० ते १५  टक्के वाढ होण्याची भीती भाजीपालाविक्रेते व्यक्त करीत आहेत. मात्र, किरकोळ बाजारात भाजीपाल्याची आवक ३० टक्क्यांनी घटल्याचा दावा करीत गुरुवारपासून १० ते २० रुपयांनी भाज्या महाग झाल्या आहेत. त्याची थेट झळ ग्राहकांच्या खिशाला बसली आहे. राज्य व राष्ट्रीय महामार्गावरून होणारी भाजीपाल्याची वाहतूक शेतकऱ्यांनी रोखून धरली आहे. त्यामुळे उद्यापासून शेतमालाची वाहतूक करण्यास शेतमाल वाहक संघटनांनी असमर्थता दर्शवली आहे, अशी माहिती कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र घोडविंदे यांनी दिली. परिणामी, उद्यापासून बाजारातील भाजीपाल्याची आवक ठप्प होण्याची चिन्हे आहेत. आज बाजार समितीत २१० टन भाजीपाला आला होता. कल्याण ग्रामीण परिसरातून २ टन भाजीपाला बाजारात आला होता. उन्हाळ्यात भाजीपाल्याची आवक तशीही कमीच असते. या काळात दररोज २१० ते २२५ टन भाजीपाला बाजारात येतो. त्यामध्ये पालेभाज्या, फळभाज्या, कांदाबटाटा, लसूण, अन्नधान्य, फुले यांचा समावेश असतो. हा माल नाशिक व नगर, पुणे या भागांतून जास्त प्रमाणात येतो. मुंबई-पुणे, कल्याण-नगर, मुंबई-नाशिक महामार्गावरून भाजीपाल्याची वाहतूक केली जाते. आलेला माल हा आजच्या दिवसापुरता मर्यादित होता. मर्यादित मालामुळे आता उद्या काय विकणार, हा घाऊक व किरकोळ भाजीपालाविक्रेत्यांपुढे प्रश्न आहे. त्यामुळे आज न विकला गेलेला भाजीपाला बाजारात उद्यापासून चढ्या दराने विकला जाईल. आज भाव वाढलेला नसला, तरी उद्यापासून तो वाढण्याची शक्यता घोडविंदे यांनी व्यक्त केली. तसे झाल्यास नागरिकांना याचा फटका बसेल.शेतकरी संपावर गेल्याने खुल्या किरकोळ बाजारात आज मिरचीचा भाव १२० रुपये होता. सिमला मिरचीचा भाव ४० रुपयांवरून ६० रुपये किलो, भेंडी ४० रुपये किलोवरून ६० रुपये, गवार ४० रुपयांवरून प्रतिकिलो ६० रुपये, काकडी २० रुपये किलोवरून ४० रुपये, फ्लॉवर ३० रुपयांवरून ४० रुपये, कोथिंबीर जुडी १० रुपयांनाच असली, तरी आकार छोटा झाला आहे. किरकोळ भाजीपाला बाजारात गुरुवारी ३० टक्के माल कमी आला, असा दावा विक्रेत्यांनी केला.