शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवली-अंबरनाथची उद्योगबंदी उठवली!

By admin | Updated: August 11, 2016 04:06 IST

पर्यावरण महत्त्वाचे असले तरी उद्योगही जगले पाहिजेत अशी भूमिका घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिवली आणि अंबरनाथमध्ये

मुंबई/कल्याण : पर्यावरण महत्त्वाचे असले तरी उद्योगही जगले पाहिजेत अशी भूमिका घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिवली आणि अंबरनाथमध्ये हरीत लवादाने लादलेली उद्योगबंदी बुधवारी उठवली. प्रदूषण होणार नाही, याचे प्रतिज्ञापज्ञ उद्योजकांनी सादर करावे, असे निर्देश त्यांनी दिले. सांडपाणी प्रक्रियेचे निकष न पाळल्यानेच डोंबिवली व अंबरनाथमधील १४२ रासायनिक कारखाने बंद करण्याची नोटीस प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावल्याने गेला दीड महिना कारखाने बंद आहेत. ते सुरू होण्याचा मार्ग या निर्णयामुळे मोकळा झाला आहे.मात्र यापूर्वीही प्रतिज्ञापत्रे सादर करून उपयोग झालेला नाही. प्रदूषण रोखण्यात नियंत्रण मंडळ कायमच कमी पडले आहे. त्यामुळे आताही त्याचा उपयोग होणार नाही, अशी भूमिका ‘वनशक्ती’ या पर्यावरण संस्थेने घेतली असून आता उद्योग सुरू झाल्यावर जर प्रदूषण झाले तर ही बंदी उठवणाऱ्या मुख्यमंत्र्यांनाच दोषी ठरवून त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करावा लागेल, असा इशाराच त्यांनी दिला आहे. पर्यावरणाचे निकष पाळण्याबरोबरच उद्योग वाचिवणे महत्त्वाचे आहेत. त्यामुळे एमआयडीसीने सांडपाणी प्रक्रि या केंद्रासंदर्भात आराखडा तयार करून निचऱ्यासाठी दोन वर्षांचे धोरण ठरवावे. तसेच पर्यावरणाच्या निकषावर बंद पडलेल्या डोंबिवली व अंबरनाथ येथील उद्योगांनी, त्यांच्या संघटनांनी पर्यावरणाचे निकष पाळण्याचे प्रतिज्ञापत्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सादर करावे, असेही फडणवीस यांनी सांगितले. या बंद उद्योगांचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री रामदास कदम आदी उपस्थित होते. . औद्योगिक क्षेत्रातील सामूहिक सांडपाणी प्रक्रि या केंद्राची जबाबदारी एमआयडीसीने घ्यावी. तसेच सांडपाणी निचऱ्याबाबत दोन वर्षाचे नियोजन सादर करावे. त्याची माहिती राष्ट्रीय हरित लवादाकडे सादर करावी. प्रक्रि या केंद्राच्या पायाभूत सुविधा आणि सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांची कामे तातडीने पूर्ण करावी, असे निर्देशही त्यांनी दिले. सामूहिक सांडपाणी प्रक्रि या केंद्रासंदर्भात अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या प्रकल्प आराखड्याचा अभ्यास करून त्याला मंजुरी द्यावी. उद्योगांनीही वापरलेल्या पाण्यावर प्राथमिक स्वरु पाची प्रक्रि या करणे बंधनकारक आहे. पर्यावरणाचे निकष न पाळणाऱ्या उद्योगांवर कारवाई करावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)