शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत ठणठणाट

By admin | Updated: May 4, 2017 05:43 IST

एकीकडे पाणीकपातीसाठी मंगळवारी शहराचा पाणीपुरवठा बंद असताना दुसरीकडे जलवाहिनी स्थलांतराच्या कामाला लागलेला

 डोंबिवली : एकीकडे पाणीकपातीसाठी मंगळवारी शहराचा पाणीपुरवठा बंद असताना दुसरीकडे जलवाहिनी स्थलांतराच्या कामाला लागलेला विलंब डोंबिवलीकरांना चांगलाच भोगावा लागला. मंगळवारचे शटडाउन आणि त्यात बुधवारी सकाळीही पाणी न आल्याने डोंबिवली पूर्व-पश्चिम भागात निर्माण झालेल्या पाण्याच्या ठणठणाटाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अखेर दुपारी पाणीपुरवठा सुरू झाला खरा, परंतु सकाळचे नियोजन बिघडल्याने याची झळ दिवसभर विविध भागांमध्ये जाणवत होती.केडीएमसी क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणी १५ जुलैपर्यंत पुरावे, यासाठी लघुपाटबंधारे विभागाने पाणीकपात लागू केली आहे. यामुळे मंगळवारी कल्याण-डोंबिवली शहरांचा तर शुक्रवारी २७ गावांमधील पाणीपुरवठा बंद असतो. शहरांचा पाणीपुरवठा मंगळवारी बंद असताना शहाड येथे काँक्रिटच्या कामात अडथळा ठरणारी तेथील १४०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी अन्यत्र स्थलांतरित करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले होते. या कामासाठी मध्यरात्री १ पर्यंत वेळ निश्चित केली होती. परंतु, हे काम वेळेत पूर्ण झाले नाही. त्यामुळे मोहिली उदंचन केंद्रामधून नेतीवली जलशुद्धीकरण केंद्राला पाणी सोडण्यात आले नाही. नेतीवली केंद्रातून डोंबिवलीला पाणीपुरवठा होतो. परंतु, या केंद्रात पाणी न आल्याने त्याचा फटका डोंबिवली शहराला बसला. यात मंगळवारच्या दिवसभराच्या शटडाउननंतर बुधवारी सकाळीही नागरिकांना पाणी मिळाले नाही. (प्रतिनिधी)दुपारपर्यंत पुरवठा सुरळीतजलवाहिनीच्या स्थलांतराच्या कामाला विलंब लागल्याने पाणी सकाळी मिळाले नाही. परंतु, दुपारपर्यंत पाणीपुरवठा सुरू झाल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता अनिरुद्ध सराफ यांनी दिली.