शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Dombivali: इतर कला जशा शिकवता येतात तशी कविता शिकविता येत नाही - कवी किरण येले

By अनिकेत घमंडी | Updated: April 24, 2023 12:25 IST

Kiran Yele: इतर कला जशा शिकवता येतात तशी कविता शिकविता येत नाही त्यासाठी मनाची संवेदनशील मशागत व्हावी लागते, असे मत कविवर्य किरण येले यांनी व्यक्त।केले.

- अनिकेत घमंडी डोंबिवली: कवी हा संवेदनाशील असतो, ती संवेदनशीलता जपायला हवी. कवी हा एका दिवसांमध्ये घडत नाही त्याची मानसिकता, संवेदनशीलता घडवणारे अनेक प्रसंग येऊन गेलेले असतात, इतर कला जशा शिकवता येतात तशी कविता शिकविता येत नाही त्यासाठी मनाची संवेदनशील मशागत व्हावी लागते, असे मत कविवर्य किरण येले यांनी व्यक्त।केले. डोंबिवली पूर्व मधील भगतसिंग रस्त्यावरील पै फ्रेंड्स लायब्ररीच्या शाखेत काव्यरसिक मंडळ,डोंबिवलीच्या कविता व काव्यविषयक साहित्याला' वाहिलेल्या द. भा.धामणस्कर वाचनालयाचे उद्घाटन रविवारी प्रख्यात कवी किरण येले ह्यांच्या हस्ते करण्यात आले.

आजचा वाचक, आजचा भिडस्त लेखक किंवा एकंदरीतच आजचा समाज अशा अनेक विषयांवर त्यांनी भाष्य केले. त्याचबरोबर कवींनी वेगवेगळ्या विषयावरचे वाचन केले पाहिजे. येले यांची अशी विचारिक जडणघडण काव्यरसिक मंडळात झाल्याचे ते म्हणाले. काव्यरसिक मंडळासाठी ही आणखी एक स्वप्नपूर्ती म्हणजेच त्या फ्रेंड्स लायब्ररीमध्ये मंडळात उपलब्ध असणाऱ्या कवितांच्या पुस्तकांचा उपलब्ध असलेला विभाग म्हणजेच धामणस्कर वाचनालय. ह्या वाचनालयाची संकल्पना काव्यरसिक मंडळाचे डॉ.प्रल्हाद देशपांडे ह्यांची आहे. काव्यरसिक मंडळाच्या विद्यमान अध्यक्ष वैदेही जोशी ह्यानी या वाचनालयाची थोडक्यात माहिती सांगितली. काव्यरसिक मंडळातर्फे दरवर्षी काव्य पुरस्कार जाहीर केले जातात. त्यावेळेस स्पर्धेसाठी आलेले काव्यसंग्रह, मंडळातील सदस्यांचे प्रकाशित साहित्य व इतर अनेक पुस्तके मंडळाकडे बरेच वर्षे जमली होती ती वाचकांपर्यंत पोचावी ही मंडळाची इच्छा पूर्ण होते आहे,ती।पूर्ण।झल्याचे सांगण्यात आले. मंडळाचे सदस्य महेश देशपांडे यांनी कविवर्य येले यांचा परिचय करून दिला.

धामणस्कर ह्यांच्या या पुढचं जीवन..ही पुस्तकविषयक कविता अध्यक्षा वैदेही जोशी ह्यांनी तर मंडळाचे सदस्य प्रवीण दामले यांनी येले यांची कविता सादर केली. कवी मुकुंदराव देशपांडे यांची यंत्र या माध्यमातून कवी आणि श्रोते या विषयावरची कविता मृणाल केळकर,मंडळाचे सदस्य कै व. शं. खानवेलकर ह्यांची कविता स्वाती भाटये तसेच अजित महाडकर ह्यानी 'पुस्तकांचे मनोगत' ही कविता सादर केली. मंडळाचे सल्लागार जयंत कुळकर्णी ह्यांनी पुस्तके व वाचनालय विषयक काही इंग्रजी लेखकांची, लेखनाची उदाहरणे तर काही उर्दू शेर ऐकवले. सूत्रसंचालन मेघना पाटील व सानिका गोडसे ह्यांनी केले. सम्राज्ञी उटगीकर ह्यांनी आभार मानले आणि पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

त्या वाचनालयात वाचकांसाठी पुस्तके उपलब्ध होण्यासाठी काही तांत्रिक गोष्टीची पूर्तता होण्यास एक महिन्याचा अवधी लागेल. त्यानंतर आता ह्या वाचनालयाच्या रूपाने हा कवी मनाचा कट्टा वाचकांसाठी सदैव खुला होईल असेही यावेळी जाहीर करण्यात आले. 

टॅग्स :dombivaliडोंबिवली