शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीतील कारखाने २३ आॅगस्टपर्यंत बंद

By admin | Updated: July 30, 2016 04:48 IST

रासायनिक सांडपाण्यावर योग्य प्रकारे प्रक्रिया होत नसल्याच्या कारणावरून गेला महिनाभर बंद असलेले डोंबिवली आणि अंबरनाथमधील कारखाने २३ आॅगस्टपर्यंत बंदच राहणार

डोंबिवली : रासायनिक सांडपाण्यावर योग्य प्रकारे प्रक्रिया होत नसल्याच्या कारणावरून गेला महिनाभर बंद असलेले डोंबिवली आणि अंबरनाथमधील कारखाने २३ आॅगस्टपर्यंत बंदच राहणार आहेत. प्रक्रियेसाठी टँकरद्वारे सांडपाणी आणण्याचा मुद्दा राष्ट्रीय हरित लवादापुढे मार्गी न निघाल्याने ही बंदी कायम राहिली आहे. त्यामुळे दीड हजार कोटींचे नुकसान होईल, असा कारखानदारांचा दावा आहे.सांडपाण्यावरील प्रक्रियेबाबत समाधानकारक प्रतिज्ञापत्र सादर करता न आल्याने लवादाने पर्यावरण खात्याच्या केंद्रीय सचिवांना फटकारले आणि सुधारित पत्र सादर करण्याचे आदेश दिले. निकषांची पूर्तता न करता सांडपाणी प्रक्रिया केंद्र चालवले जात असल्याबद्दल २ जुलैपासून डोंबिवलीतील ८६ आणि अंबरनाथमधील ५६ कारखाने बंद करण्याची कारवाई महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण विभागीय कार्यालयाने केली होती. तसेच अंबरनाथ व डोंंबिवली फेज-२ मधील सांडपाणी प्रक्रिया केंद्र बंद करण्याचे आदेश दिले होते. त्याला कारखानदारांनी लवादापुढे आव्हान दिले होते. या स्थगिती अर्जाच्या याचिकेवर २३ आॅगस्टला सुनावणी होणारआहे. कारखानदार आणि डोंबिवली एमआयडीसीच्या फेज-२मधील सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या संचालक मंडळाने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांकडे सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे. लवादाचा निर्णय होईपर्यंत कारखान्यातील रासायनिक सांडपाणी टँकरद्वारे सांडपाणी प्रक्रिया केंद्रात नेऊन त्यावर प्रक्रिया करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती केली आहे. प्रादेशिक अधिकाऱ्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देत तोंडी मान्यता दिली आहे. मात्र, टँकरद्वारे सांडपाणी प्रक्रिया केंद्रापर्यंत वाहून नेण्यास लेखी मान्यता अद्याप मिळाली नाही. दरम्यान, समाधानकारक प्रतिज्ञापत्र सादर न केल्याने पर्यावरण व वन खात्याच्या केंद्रीय सचिवांना लवादाने चांगलेच फटकारले. (प्रतिनिधी)प्रतिज्ञापत्रातील माहिती दिशाभूल करणारी- सध्याच्या प्रतिज्ञापत्रातील माहिती मोघम असल्याचे लवादाचे म्हणणे आहे. डोंबिवली एमआयडीसीच्या पहिल्या पेजमधील प्रक्रिया केंद्राची प्रक्रिया क्षमता १६ दशलक्ष लीटर असतानाही तेथे फक्त ११ दशलक्ष लीटर सांडपाणी येते. त्यामुळे सर्व निकषांची पूर्तता सहज शक्य असल्याचा दावा त्या प्रतिज्ञापत्रात होता. मात्र, त्या दाव्याला ‘वनशक्ती’ पर्यावरणने आक्षेप घेतला.ज्या काळातील हा दावा आहे, त्या काळात पाणीकपात लागू असल्याने कारखान्यांतून येणारे सांडपाणी कमी झाल्याचे म्हणणे त्यांनी मांडले आणि प्रतिज्ञापत्रातील माहिती दिशाभूल करणारी असल्याचा दावा केला. प्रक्रिया केलेल्या पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाण वाढल्याबाबत प्रतिज्ञापत्रात उल्लेख नसल्याकडे त्यांनी लक्षवेधले. त्यामुळे संबंधित खात्याला नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश लवादाने दिला. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३१ आॅगस्टला होेणार आहे.