शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

डोंबिवली : भंगारचोरांकडून १२ लाखांचा माल जप्त, सहा जणांना अटक : भंगार व्यावसायिकांचाही सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 02:46 IST

एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमध्ये भंगाराची चोरी करणाºया सहा जणांना कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. या गुन्ह्यांमध्ये चोरीला गेलेल्या १५ लाख रुपयांच्या मुद्देमालापैकी ११ लाख ९१ हजारांचा माल हस्तगत करण्यात आला आहे.

डोंबिवली : एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमध्ये भंगाराची चोरी करणाºया सहा जणांना कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. या गुन्ह्यांमध्ये चोरीला गेलेल्या १५ लाख रुपयांच्या मुद्देमालापैकी ११ लाख ९१ हजारांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. या गुन्ह्यात भंगार व्यावसायिकांचाही सहभाग असल्याचे उघड झाले आहे.शहरात घरफोडीच्या घटना वाढत असताना दुसरीकडे चोरट्यांकडून येथील एमआयडीसीतील कंपन्यांना लक्ष्य केले जात होते. या कंपन्यांमध्ये होत असलेल्या चोºयांबाबत खबºयांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी सापळा रचून १४ सप्टेंबरला इम्रान खान आणि मनोज गौतम यांना जेरबंद केले. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक संतोष शेवाळे, पोलीस नाईक राजेंद्र खिलारे, पोलीस हवालदार दत्ताराम भोसले, विश्वास चव्हाण, सुरेश निकुळे आणि हरिश्चंद्र बांगारा या पथकाने केली.आरोपींनी चौकशीत आणखी साथीदारांची नावे उघड केली. यात गुन्ह्यातील माल विकत घेणारा भंगार व्यावसायिक शंकर बोथ यालाही बेड्या ठोकण्यात आल्या. त्याच्याकडून ४ लाख ११ हजार रुपयांचा चोरीला गेलेला माल हस्तगत करण्यात आला. तसेच रियाज खान आणि रामबली ऊर्फ बबलू चौहान या भंगार व्यावसायिकांनाही जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. भंगारचोरीत आणि त्या चोरीच्या मालाची विक्री करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाºया गणेश पाटील यालाही पकडण्यात आले. मानपाडा परिसरातील सात कंपन्यांमध्ये चोरी केल्याची कबुली आरोपींनी दिल्याचे शेवाळे यांनी सांगितले.

टॅग्स :Arrestअटकdombivaliडोंबिवली