शहरं
Join us  
Trending Stories
1
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
2
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
3
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
4
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
5
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
6
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
7
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
8
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
9
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
10
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
11
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
12
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
13
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
14
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
15
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
16
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
17
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
18
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
19
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
20
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?

लाकडी बॅटने श्वानाला बेदम मारहाण, उपचारा दरम्यान श्वानाचा मृत्यू; गुन्हा दाखल

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: September 21, 2024 18:37 IST

या प्रकरणी गोकुळ थोरे या आरोपी विरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ठाणे : घोडबंदर रोड येथील मोघरपाडा येथे राहणाऱ्या गोकुळ थोरे या इसमाने एका भटक्या श्वानाच्या डोक्यात लाकडी बॅटने बेदम मारहाण करुन त्याला ठार केले. या प्रकरणी गोकुळ थोरे या आरोपी विरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.सामाजिक कार्यकर्त्या सोनाली वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार १९ सप्टेंबर रोजी रात्री ८ वा. आरोपी गोकुळ थोरे, ३५ वर्षे, याने कोणतेही कारण नसताना श्वानाला (फिटक चॉकलेटी रंगांचा, नर जातीचा) गुरूवारी सायं. ७.३० वाजण्याच्या सुमारास मोघरपाडा येथे बॅटने बेदम मारहाण करुन त्याला गंभीर जखमी केले. या श्वानाला विविध पशुवैद्यकीय रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान शुक्रवारी दुपारी १.३० च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.सामाजिक कार्यकर्त्याच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी बीएनएसच्या कलम ३२५ (प्राण्याला मारून किंवा अपंग करणे) आणि प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींनुसार गुन्हा नोंदवला आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू असून या गुन्ह्यासंदर्भात अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही, असेही कासारवडवली पोलीसांनी सांगितले.

टॅग्स :dogकुत्राthaneठाणे