शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कोणी लस देता का लस ? दुसरा डाेस मिळणेही दुरापास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 23:30 IST

लसींचा ठाणे जिल्ह्यात तुटवडा : दुसरा डाेस मिळणेही दुरापास्त

अजित मांडके

ठाणे : केंद्राने १ मेपासून १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू केले आहे. परंतु, ठाणे जिल्ह्याची परिस्थिती पाहता मागील दोन दिवसांत १८ ते ४४ या वयोगटातील केवळ तीन हजार १४७ जणांचेच लसीकरण झाले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक वयोगटातील हेच नागरिक असतानाही केवळ लसींच्या तुटवड्यामुळे त्यांना लस घेता येत नाही. त्यामुळे कोणाला पहिला तर कुणाला दुसरा डोस मिळणे आता दुरापास्त झाले आहे. जिल्ह्याला लसींचा जेमतेम साठा मिळत असल्याने जिल्ह्यातील अनेक ठिकाणची केंद्रे बंद आहेत.

जिल्ह्यात लसीकरण मोहिमेला मागील काही दिवसांपासून ब्रेक लागला आहे. पुरेसा साठा उपलब्ध होत नसल्याने काही ठिकाणचे लसीकरण केंद्र बंद, तर काही ठिकाणी अवघ्या दोन तासांसाठी जो साठा शिल्लक आहे, त्यातून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनाच लस दिली जात आहे. ठाणे शहरात अशीच स्थिती आहे. त्यामुळे ४५ वयोगटातील पुढील नागरिकांचा दुसरा डोस असला तरी त्यांना लसीकरण केंद्र गाठता येत नाही. केंद्रांवर लसी नसल्यानेच कुणी लस देता लस, अशी म्हणण्याची वेळ आली आहे. तर यात ज्येष्ठांचे हाल सुरू झाले आहेत. त्यांनादेखील आता लस मिळवण्यास अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. ठाण्यात ५६ केंद्रांवर काही दिवसांपूर्वी लसीकरण सुरू होते. परंतु, लसींचा साठाच उपलब्ध न झाल्याने सोमवारी केवळ एकच केंद्र सुरू होते. आतापर्यंत जिल्ह्यात १२ लाख ३४ हजार ५६६ जणांचे लसीकरण झाले असून, अद्यापही ८० टक्के लसीकरण शिल्लक आहे. परंतु, लसींचा साठाच उपलब्ध झाला नाही तर लसीकरणाला दोन वर्षेदेखील कमी पडतील, अशी परिस्थिती सध्या आहे.

कोणी काय करायचे?n१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू झालेले आहे. त्यानुसार लसीकरणासाठी ऑनलाइन स्लॉट बुक करावा लागत आहे. परंतु, केवळ पहिला मेसेज आला असेल तर केंद्रावर गर्दी करू नये, असे आवाहन करून तारखेचा दुसरा स्लॉट बुक झाल्यानंतरच केंद्रावर यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.n४५ वर्षांपुढील नागरिकांनी ज्यांनी पहिला डोस घेतला असेल त्यांनी दुसरा डोस घेण्यासाठी घाई करू नये, लसींचा तुटवडा असल्याने लस जशा उपलब्ध होतील, त्यानुसार आता केंद्रांची यादी पाहूनच त्या ठिकाणी जाऊन टोकन घेऊन लस घ्यावी.

मी पहिला डोस घेतला आहे. आता मला दुसरा डोस घ्यायचा होता. परंतु, दिलेली तारीख निघून गेलेली असून, अद्यापही डोस मिळालेला नाही. लस घेण्यासाठी सकाळपासून रांगा लावून केवळ काही जणांनाच टोकन दिले जात असल्याने परत घरी यावे लागत आहे. त्यामुळे दुसरा डोस केव्हा मिळणार, असा प्रश्न सतावत आहे.    - रामचंद्र जाधव, ज्येष्ठ नागरिक

जिल्हा प्रशासनाच्या वतीने लसीकरणाचे नियोजन करण्यात येत आहे. लसींचा साठा जसा उपलब्ध होत आहे, त्यानुसार त्याचे नियोजन करण्याचे प्रयोजन आमच्या पातळीवर सुरू आहे. लसींचा साठा जास्त प्रमाणात उपलब्ध झाला तर त्यासाठीदेखील लसीकरण केंद्र वाढवून लस देण्यासाठी आमची यंत्रणा सज्ज आहे.    - डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्य     चिकित्सक, ठाणे

मी ऑनलाइन नोंदणी केली आहे, त्यानुसार मला तारखेचा मेसेजदेखील आला आहे. परंतु. सोमवारी शहरातील सर्वच केंद्रे बंद होती. त्यामुळे मला लस घेता आली नाही. हा भाेंगळ कारभार आहे. - मिलिंद गायकवाड, नागरिक

मी ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्यानुसार लस घेण्यासाठी मी गेलो होतो. परंतु, लसींचा तुटवडा असल्याने मला ती घेता आली नाही. संबंधित केंद्रावर जेवढा लसींचा साठा असेल तेवढ्याच नागरिकांना आत घेतल्याने मला परत यावे लागले आहे.    - विशाल कांबळे, नागरिक

 

टॅग्स :thaneठाणेCorona vaccineकोरोनाची लस